शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मोखाड्यात आणखी एका कुपोषित बालकाचा मृत्यू

By admin | Updated: September 12, 2016 03:00 IST

कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने ३० आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याच ग्रामपंचायतीमधील खोच येथील ईश्वर सवरा

रविंद्र साळवे,  मोखाडाया तालुक्यातील कळमवाडी येथील सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने ३० आॅगस्ट रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना याच ग्रामपंचायतीमधील खोच येथील ईश्वर सवरा या दोन वर्षीय बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्याच मतदारसंघात कुपोषण बळीच्या एकामागे एक घटना घडत असल्याने सवरा यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली असून या कुपोषण बळी कुटुंबाला सांत्वन करायला पालकमंत्र्यांना मात्र वेळ नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम आणि सभापती सारिका निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन सांत्वन केले मोखाड्यात कुपोषण बळीच्या एका मागोमाग अनेक घटना घडत आहेत तरी देखील येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी बालरोग तज्ञ पद रिक्त असून लवकरात लवकर ही पदे भरली जावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या पुढे कुपोषणामुळे बळी पडल्यास मंत्रालयासमोर किंवा तहसील कार्यालय समोर त्याचे अंत्यविधी केले जातील, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिली असून कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी आदिवासी विभाग आरोग्य विभाग एकात्मिक बाल विकास कार्यालय यांची सर्वांची आहे यांनी आपली जबाबदारी पार पाडायला हवी अशी प्रतिक्रि या लोकमतशी बोलताना दिली.१९९२-९३ वावर वांगणीत उद्भवलेले कुपोषणाच्या बळींचे सत्र आजतागायत आदीवासींची पाठ सोडायला तयार नाही. दिवसेंदिवस ते कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कुपोषणाच्या आकडेवारीत भरच पडली आहे. पालघर जिल्ह्यात ७ हजार ५२९ बालके कुपोषणाने पिडीत असून ० ते १ वर्षातील ४४१ आणि १ ते ६ वर्षातील १४६ आणि मोखाड्यात १३ अशा एकूण ६०० बालकांचा मृत्यू झाला असून मोखाड्यात ४९३ बालके मृत्यूच्या दाढेत आहेत. कुपोषणाला आटोक्यात आणण्यासाठी आजतागायत अनेक योजना अमलात आणल्या गेल्या परंतु कुपोषणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कुपोषणामुळे मोखाडा तालुका संवेदनशील असून देखील या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ नाहीत. २०१३ पासून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अमलात आणली तीत स्तनदा माता, गरोदर माता यांना २५ रुपयात आहार देण्याची तरतूद होती. परंतु २५ रुपयात सकस आहार कसा पुरवणार हा प्रश्न निर्माण होऊन मे महिन्यापासून या योजनेचा निधीच न आल्याने ही योजनाच कुपोषित झाली आहे.