शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

नेरळमध्ये अंगणवाड्यांची दुरवस्था

By admin | Updated: June 25, 2017 04:13 IST

कर्जत तालुक्यातील अनेक गावांमधील अंगणवाड्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाड्यांकडे स्थानिक

कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील अनेक गावांमधील अंगणवाड्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाड्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांची अवस्था बिकट बनली आहे. पावसाळ्यात तर अनेक अंगणवाड्यांच्या शेड व स्लॅबमधून पाणी पडत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक अंगणवाड्यांच्या इमारती खूप जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. विशेषत: शेलू गावातील मध्यभागी असलेली अंगणवाडीची इमारत खूप जुनी असल्याने अनेक वर्षांपासून मोडकळीस आली आहे. इमारतीची दुरुस्ती व नव्याने उभारण्याची मागणी होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीने याकडे मात्र डोळेझाक केली आहे. अंगणवाडी सेविकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे, तसेच अंगणवाड्यांमध्ये वीजजोडणीसंदर्भात ग्रामसभेतही प्रश्न उपस्थित केले आहेत; परंतु याकडे गांभीर्याने विचार केला जात नाही.माजी पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य याच ग्रामपंचायत हद्दीत राहत असल्याने त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेलू ग्रामपंचायत हद्दीत एकूण ७ अंगणवाड्या असून, एखादी अंगणवाडी सोडली, तर अनेक अंगणवाड्यांच्या छपरामधून पावसाचे पाणी पडते. तसेच शेलू गावातील पोस्ट आॅफिसजवळ असलेली अंगणवाडी भाड्याच्या जागेत भरत असून, ग्रामपंचायत महिन्याला सुमारे सहा हजार रुपये या इमारतीचे भाडे अदा करते; परंतु या भाड्याच्या अंगणवाडीच्या आजूबाजूला सांडपाणी वाहत असून, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे लहान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेलूमध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेच्या इमारती दुर्लक्षित आहेत, अशा इमारतींची दुरु स्ती करणे गरजेचे असताना याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण होत आहे.