शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चालविताना मोबाइलचा वापर करणे आले अंगलट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:37 IST

५ हजार २८८ वाहनचालकांवर कारवाई; २६ लाख ४४ हजार दंड वसूल

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वाहन चालविताना सतत मोबाइलवर बोलन वा व्हाॅट्सॲपवर चॅट करण्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून गाडीला आरसा नसल्यास व विनाहेल्मेट गाडी चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोबाइलवर बोलत जाणाऱ्या, पण हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ५ हजार २८८ वाहनचालकांवर कारवाई करून २६ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मोटरसायकलला दोन आरसे लावणे बंधनकारक आहे. मात्र आजची स्टाईल म्हणून आरसे न लावता मोटरसायकलस्वार गाडी हाकताना दिसत आहेत. त्यामुळे मागून ओव्हर टेक करणारा दिसून येत नाही. दुचाकी वाहनांना लावण्यात येणारे दोन आरसे हे वाहतुकीच्या नियमातून लावले जातात; परंतु युवावर्ग गाडी माॅडीफाय करून दोन्ही आरसे काढीत आहेत.

आरसा नाही म्हणून २०० रुपयांचा दंड मोटरसायकलला माॅडीफाय करून तिचा स्पोर्ट्स बाईक म्हणून वापर करणारे गाडीचे दोन्ही आरसे काढून टाकतात. त्यामुळे मोटरसायकलस्वारांना अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागते. अपघात थोपविण्यासाठी मोटरसायकलला आरसा नाही म्हणून २०० रुपये दंड आकारण्यात येतो.

वाहतुकीचे हे नियम बंधनकारक मोटार वाहन कायद्याअंतर्गत असणारे सर्व नियम बंधनकारक आहेत, तसेच गाडीची कागदपत्रे नसणे, हेल्मेट व इन्शुरन्स नसल्यामुळे ४ कोटी ६९ लाख ५ हजार ६०० रुपयांचा दंड वर्षभरात वसूल करण्यात आला आहे.

गेले अनेक दिवस मोबाइलचा वापर करीत वाहन चालविणाऱ्या नागरिकांत वाढ झाली आहे. तसेच सध्या गाडीला आरसे न लावणाऱ्या वाहनचालकांना समज देऊन त्यांना आरसे लावण्यासाठी पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच गाडीला आरसा नसल्यामुळे मोटरसायकलस्वाराकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.- रवींद्र शिंदे,  वाहतूक पोलीस निरीक्षक 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी