शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

उमटे धरणातील दूषित पाण्यामुळे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:54 IST

रामराज परिसरातील उमटे धरणातून तब्बल ६२ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा गेले कित्येक वर्षे होत आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : तालुक्यातील रामराज परिसरातील उमटे धरणातून तब्बल ६२ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा गेले कित्येक वर्षे होत आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प नुसता नावालाच उभारला असल्याने सुमारे एक लाख २० हजारांच्या लोकसंख्येला अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे, यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बेफिकीर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या मागणीचे निवेदन आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीने विविध सरकारी यंत्रणांना दिलेआहे.उमटे धरणातून पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, अशी ग्रामस्थांची जुनीच मागणी आहे. गावातील सुशिक्षित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबतचा विषय लावून धरल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने एक महत्त्वपूर्ण योजना मंजूर केली होती. यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सुधारित उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी सहा कोटी ५१ लाख ८० हजार १९२ रु पयांचा निधी २०१४-१५ साली मंजूर करण्यात आला. धरणातील पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ४.५ द.ल.घ.मी. क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. असे असतानाही ग्रामस्थांना अशुद्ध, मातीमिश्रीत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. परिसरातील तब्बल ६२ गावांतील सुमारे एक लाख २० हजार नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले होते. मात्र, त्यालाही बराच अवधी लोटला आहे. त्यामुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागणे हे लाजिरवाणे आहे. अशुद्ध पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी जिल्हा परिषदेने खेळ सुरू केला आहे, असे आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. अशा कामचुकार, बेफिकीर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केलीआहे.याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.>अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातसरकारी यंत्रणा उमटे धरणाच्या गाळाच्या तसेच अशुद्ध पाण्याच्या बाबतीत कोणतीही कार्यवाही करत नाही. म्हणून परिसरातील गावातील पदवीधर तरु णांनी १ मे २०१९ रोजी रोजी धरणाचा गाळ काढण्यासंदर्भात गांधीगिरीने दिवसभर श्रमदान करून सरकार आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाने फक्त वेळकाढूपणा केला. वेळीच धरणातील गाळ काढला असता तर आज गढूळ पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली नसती. अशुद्ध पाणीपुरवठा करून एक प्रकारे विषच पिण्यासाठी दिले जात आहे. या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या अर्जावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या हितासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशाराही अ‍ॅड. पाटील यांनी दिला.>धरणातील गाळ काढला नाहीमोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे. त्यामुळे या योजनेतील निधी नक्की कोणी आणि कोठे जिरवला आहे. यासाठी लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद आहे.उमटे धरण योजना निर्माण केल्यानंतर गेल्या ४० वर्षांत या धरणाचा गाळ काढलेला नाही.हा गाळ काढण्यासंदर्भात स्थानिक सामाजिक संस्था तसेच आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी यांच्या वतीने १४ जून २०१८ रोजी तक्र ार अर्ज करण्यात असल्याकडेही निवेदनातून लक्ष वेधलेआहे.>साखरचौथ गणेशोत्सवात उमटे धरणातील अशुद्ध पाण्याचे पडसादनुकत्याच पार पडलेल्या साखरचौथ गणेशोत्सवातही उमटे धरणातील अशुद्ध पाण्याचे पडसाद दिसून आले.भोनंग येथील सार्वजनिक साखरचौथ गणेश मंडळाने उमटे धरणाचा देखावा उभा केला होता.धरणाच्या माध्यमातून अशुद्ध पाण्याचा कसा पुरवठा होतो. हे शेखर झावरे, शेखर शेळके आणि जयेश शेळके या तरुणांनी आपल्या संकल्पनेतून सर्वांच्या नजरेस आणण्याचा प्रयत्न केला आहे.सोशल मीडियावरही याबाबतची पोस्ट व्हायरल झाल्याने हजारो लाइक आणि व्यवस्थेविरोधात जनक्षोभाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.>उमटे धरणातून गढूळ पाणीपुरवठा होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. धरणावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. काही तांत्रिक अडथळे होते, त्याबाबतचे काम प्रगतिपथावर आहे. पुढील आठ दिवसांमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात येऊन नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.- आर. पी. कोळी,कार्यकारी अभियंता