शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी भरते सेविकेच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:03 IST

नेरळ परिसरातील कोलीवली येथील अंगणवाडी रस्त्याबरोबरच मूलभूत सोयीसुविधांअभावी सेविकेच्या घरात भरवली जात आहे.

- कांता हाबळे नेरळ : नेरळ परिसरातील कोलीवली येथील अंगणवाडी रस्त्याबरोबरच मूलभूत सोयीसुविधांअभावी सेविकेच्या घरात भरवली जात आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही वाकस ग्रामपंचायत आणि एकात्मिक बालविकास विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायत हद्दीतील कोलीवली अंगणवाडीची स्थापना २००६ साली करण्यात आली. तेव्हापासून ती अंगणवाडी सेविकेच्या घरात भरवली जात आहे. त्या वेळी त्यांना घराचे भाडे दिले जात होते; परंतु २०१०-११ मध्ये महिला व बालकल्याण विभाग रायगड व जिल्हा परिषदेकडून नाबार्ड योजनेअंतर्गत सुमारे ४ लाख रु पये खर्च करून सुसज्ज इमारत कोलीवली गावाबाहेर बांधण्यात आली आहे. अंगणवाडीत सध्या २५ बालके आहेत; परंतु रस्त्याअभावी पावसाळ्यात ही अंगणवाडी सेविकेचा घरातच भरवली जात आहे. अंगणवाडीसाठी इमारत उभारण्यात आल्याने आता घरमालकाला भाडे देणेही बंद करण्यात आले आहे.आतापर्यंत अनेक वेळा अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायत आणि एकात्मिक बालविकास यांच्याकडे रस्त्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी सुरक्षा भिंत नाही, अन्न शिजवण्यासाठी कोणतेही साहित्य नाही की स्वतंत्र जागा नाही. या ठिकाणी वीजही नाही. शिवाय पावसाळ्यात आजूबाजूला झाडीझुडपे वाढल्याने सर्पदंश, विंचूदंशाची शक्यता नाकारता येत नाही.दोन वर्षांपूर्वी ग्रामनिधीच्या १० टक्के निधीतून एक कचराकुंडी देण्यात आली आहे. त्यानंतर पायरी व खिडकीची दुरु स्ती आणि साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे; परंतु अद्याप ग्रामपंचायतही दखल घेत नाही. अंगणवाडीत जाण्यासाठी रस्ता, पिण्यासाठी शुद्ध पाणी, लाइट, अंगणवाडीभोवती संरक्षक भिंत अशा सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी अंगणवाडी सेविका आणि पालकांनी केली आहे.>रस्त्याअभावी पावसाळ्यात अंगणवाडी घरात भरविल्याशिवाय पर्याय नाही. अनेक वेळा वाकस ग्रामपंचायत आणि एकात्मिक बालविकास कर्जत यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही. तसेच अंगणवाडीची पायरी व खिडक्या दुरु स्तीसाठी पत्रव्यवहार केला आहे. दोन वर्षांपूर्वी अंगणवाडीला ग्रामपंचायतीने १० टक्के निधीतून कचराकुंडी दिली आहे. त्यानंतर काहीही देण्यात आले नाही; परंतु अंगणवाडीमध्ये लाइट, पाणी, जेवणासाठी शेगडी अशा अडचणी आहेत.- रेश्मा कोळंबे,अंगणवाडी सेविका,कोलीवली>कोलीवली अंगणवाडीत जाण्यासाठी जो कच्चा रस्ता आहे त्या रस्त्यासाठी चार वर्षांपूर्वी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न केले होते; परंतु काही अडचणी आल्या होत्या. येत्या दिवाळीनंतर रस्ता तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करून रस्ता चांगल्या दर्जाचा करू.- संजय तांबोळी,विद्यमान सदस्य,वाकस ग्रामपंचायत>अंगणवाडीकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून या रस्त्यासाठी काही प्रयत्न करण्यात आले नाहीत; परंतु कोलीवली अंगणवाडीला जेवण शिजवण्यासाठी शेगडी देण्यात येणार आहे व १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून दुरु स्ती करण्यात येणार आहे, असे मासिक सभेत ठरले आहे.- दिगंबर बागुल,ग्रामसेवक, वाकस ग्रामपंचायत