शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम    

By राजेश भोस्तेकर | Updated: December 26, 2023 19:13 IST

या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरोदर माताची कपड्याची चिंता मिटली आहे. 

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात नवीन जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकांना टॉवेल देण्याचा मानस प्रशासनातर्फे केला होता. त्यादृष्टीने मंगळावर २६ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या दिवसापासून नवजात बालकांना टॉवेल देण्याचा नाविन्य पूर्ण उपक्रम सुरू केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे डॉ. भरत बास्टेवाड यांच्या शुभहस्ते कार्यक्रम जिल्हा रुग्णालयात संपन्न झाला. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरोदर माताची कपड्याची चिंता मिटली आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी (घुगे), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील,  मेट्रन मॅडम भोपी, जिल्हा लेखा व्यव्यस्थापक श्री. संतोष पाटील, फायनान्स कम लॉजिस्टिक कंसल्टंट श्री. प्रथमेश मोकल, आरबीएसके डीपीएस श्री. सुनील चव्हाण, प्रसूती विभागातील इन्चार्ज सिस्टर, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी हे प्रमुख उपस्थित होते.      

जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आदिवासी वाडी, वस्ती व गरीब घरातून अशा विविध ठिकाणावरून प्रसूतीसाठी गरोदर माता येत असतात. याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात दर महिन्याला ३०० ते ३५० प्रसूती या मोफत केल्या जातात. यामध्ये गुंतागुंतीच्या तसेच सीझर करण्यात आलेल्या प्रसूतींचाही समावेश होत आहे. 

प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर माता या जिल्ह्यातील विविध भागातून येत असतात. घाई गडबडीमध्ये येत असल्यामुळे, येताना त्या कोणत्याही प्रकारचे कपडे, वस्त्र घेऊन येत नाहीत किंवा आणलेले वस्त्र हे जुने व अस्वच्छ असल्यामुळे, नवजात बालकाला आरोग्याच्या दृष्टीने संसर्ग होण्याची शक्यता असते. या काळात नवजात बालकाची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात बालकांना मोफत टॉवेल देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्णकार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड  यांच्या शुभहस्ते व  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. 

जिल्हा रुग्णालयाचा होत असलेला पूर्ण कायापालट हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे मुळे होत असल्याचे सांगून जिल्हा शल्यचिकित्सक यांचे डॉ भरत बास्टेवाड यांनी विशेष कौतुक केले. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता माझे नेहमीच सहकार्य राहील, असे अभिवाचन दिले.     या नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता सामाजिक बांधिलकीतून रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे यांच्या सीएसआर फंडामधून आवश्यक ते सहकार्य मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु संजय माने यांनी केले. 

टॅग्स :alibaugअलिबागhospitalहॉस्पिटल