शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

आंबेत, दादली पुलाची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:44 IST

संडे अँकर । कामगार, निधीचा अभाव : पावसाळ्यात धोका कायम

सिकंदर अनवारे ।लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड आणि माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाउनमुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे. यामुळे पावसाळ्यात या तिन्ही पुलांचा धोका कायम राहिला आहे.तिन्ही पूल १९८० च्या दशकात बांधण्यात आले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर पुलांचे निरीक्षण करण्यात आले होते. यामध्ये पुलांची पाया दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. तर आंबेत आणि टोळ या दोन्ही पुलांचे बेअरिंग बदलण्यासाठी पूल उचलले जाणार आहेत. मात्र कामगार, निधीचा अभावामुळे काम रखडले आहे.महाड जवळील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये वाहून गेला. या दुर्घटनेत मनुष्यहानीही झाली. यानंतर संपूर्ण देशभरात याचे पडसाद उमटले. शासनाने जुन्या पुलांचे निरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाडनजीक १९८० मध्ये बांधण्यात आलेले दादली, टोळ, भावे, बिरवाडी आणि माणगावमधील आंबेत पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये टोळ, आंबेत आणि दादली या पुलांचे पाण्याखालील भागाचे निरीक्षण आणि तपासणी केल्यानंतर पुलांच्या पायाला दुरुस्तीची गरज असल्याचे निरीक्षण करणाऱ्या एजन्सीकडून सुचवण्यात आले.आंबेत पुलाकरिता साडेनऊ कोटी, टोळ पुलाकरिता अडीच कोटी, तर दादली पुलाकरिता साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तिन्ही पुलांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सावित्री नदीवरील मोठे पूल आहेत. शिवाय हे तिन्ही पूल रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारे आहेत. यामुळे पुलांना विशेष महत्त्व आहे. पुलांवरून सातत्याने अवजड वाहनांची आणि प्रवासी वाहनांची वर्दळ असल्याने त्यांची दुरुस्ती प्राधान्याने करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे.आंबेत पुलावरील कठड्याची दुरुस्ती केली जात असून यादरम्यान या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही सर्व वाहतूक महाड मार्गे वळवण्यात आली आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल बेअरिंग पद्धतीचे आहेत. पुलांना जवळपास ४० वर्षे झाली आहेत. यामुळे पुलाखालील भागात दुरुस्ती केली जात आहे. पाण्याखाली असलेली पायाचे काँक्रिट निखळले आहे. ते काढून पुन्हा आधुनिक पद्धतीचे काँक्रिट लावले जाणार आहे. आंबेत पुलाच्या बेअरिंग नादुरुस्त झाल्या आहेत. या बेअरिंग दुरुस्तीसाठी पुलाचे भाग उचलावे लागणार आहेत. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उपयोगात आणली जाणार आहे. आंबेत आणि दादली पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता होती तर टोळ पुलाच्या पायाला उभ्या भेगादेखील आधुनिक पद्धतीने भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बाहेरून काँक्रिटचे आवरण केले जाणार आहे. या पुलाच्यादेखील बेअरिंग बदलल्या जाणार आहेत. असेच काम दादली पुलाचेदेखील केले जाणार आहे. दादली पुलाचा पाया आणि खालील खडक यामध्ये तयार झालेली पोकळी काँक्रिटच्या साहाय्याने भरण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कामगार व निधीअभावी ही कामे ठप्प झाली आहेत.टोळ, दादली, आंबेत तिन्ही पुलांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका दुरुस्तीकामांनाही बसला आहे. निधी आणि कामगार नसल्याने हे काम सध्या थांबले आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर असल्याने काम पूर्ण होणे शक्य नाही.- शिवलिंग उल्लागडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग