शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामाविरोधात आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:37 IST

नेरळ-कळंब, नेरळ-बोपेले, नेरळ-कशेळे या रस्त्यालगत खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

कर्जत : तालुक्यातील नेरळ-कळंब, नेरळ-बोपेले, नेरळ-कशेळे या रस्त्यालगत खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याविषयी गेले दीड ते दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विजय हजारे यांनी शासन दरबारी लेखी तर कधी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. मात्र, शासन अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीऐवजी केवळ टोलवाटोलवी सुरू आहे.अनेक कार्यालयाच्या अधिकाºयांनी लेखी पत्र देवून कारवाई करण्याचा शब्द दिला, मात्र प्रत्यक्षात कारवाई नाही. अधिकाºयांच्या खोट्या भूलथापांना कंटाळून विजय हजारे यांनी मंगळवारी दुपारी आमरण उपोषण सुरू केले आहे.हजारे यांच्या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (अलिबाग) अधिकारी प्रत्यक्षात येत नाही, आणि बांधकाम तोडण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणात रस्त्यालगत संबंधित अधिकाºयांनी अधिकाराचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली आहे. जाणीवपूर्वक इमारतीची बांधकामे न थांबविणे किंवा काढून टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. विभागातील अधिकाºयांनी ७६ बांधकामे अनधिकृत ठरवली असूनही सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे अनेक कुटुंबे बेघर, उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी सदनिकांची खरेदी-विक्र ी ही थांबविण्याचे आदेश दिले आहे. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाºयांनी संदर्भपत्राचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा नोंदवून अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात यावी तसेच अद्यापपर्यंत त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे अखेर तंटामुक्त अध्यक्ष विजय हजारे यांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.२०१७ पासून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणात नेरळ-कळंब रस्ता, नेरळ-कशेळे व नेरळ व बोपेले रस्ता व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यालगत होणाºया नियमबाह्य अनधिकृत बांधकामे थांबविण्याबाबत शासन दरबारी सतत अर्ज करीत आहे. रस्त्यालगत संबंधित अधिकारी ग्रामसेवक, तलाठी मंडळाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय प्रांत अधिकारी, उपअभियंता बांधकाम उपविभाग, दुय्यम निबंधक कर्जत, नेरळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग, रायगड जिल्हाधिकारी या सक्षम अधिकाºयांनी सदर रस्त्यावरून विकासकामांना भेटी देत, फिरती करून प्रवास भत्ताही घेतला आहे.