शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीबरोबरच शेतकऱ्यांनी आंबा, भाजीपाला लागवड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:14 IST

रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी भातशेतीबरोबरच आंबा, भाजीपाला लागवड करून तसेच मत्स्य व्यवसाय करून उत्पादन वृद्धी वाढवून आर्थिक विकास साधावा.

कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी भातशेतीबरोबरच आंबा, भाजीपाला लागवड करून तसेच मत्स्य व्यवसाय करून उत्पादन वृद्धी वाढवून आर्थिक विकास साधावा. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी केले.रायगड जिल्हा विकास मंडळ व अलिबाग तालुका आंबा बागायतदारांची सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने हाशिवरे येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकºयांनी प्रक्रिया उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही शेळके यांनी सांगितले. यावेळी कृषी फलोत्पादन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.मेळाच्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्टÑ राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल होते. कोकणात आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ झाला आहे. या मोहोराचे संवर्धन महत्त्वाचे आहे. कारण याचवेळी अनेक रोगांचे आक्रमण होते. ते रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व औषधांच्या फवारण्यासाठी कृषी अधिकाºयांचे व कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मार्गदशर््न तसेच मान्यवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खाºया निमखाºया पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढविणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे मोकल यांनी सांगितले.एपीएमसीमध्ये शेतकºयांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कोकणात प्रत्येक जिल्ह्यात विक्री केंद्र उभारणे, आंध्र व कर्नाटकच्या आंब्याचे आक्रमण रोखण्यासाठी कोकण हापूसचे ब्रँडिंग करणे, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. कोकण हापूसला यूएईबरोबरच आशिया खंडात देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेता सेंद्रिय आंबा व भाजीपाला उत्पादनावर भर द्यावा, असेही आवाहन केले.आंब्यावरील कीड रोगाचे नियंत्रण, औषध आंबा मोहोराचे संरक्षण, शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर कर्जत कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. अविनाश शिंदे यांनी तर सर्व प्रकारच्या अन्य व्यवसायावर तारापूर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. प्रकाश शिंगारे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Raigadरायगड