शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

निविदा येण्याआधीच कामाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:03 IST

अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच कामांचे वाटप होऊन कामांना सुरु वात झाली आहे.

अलिबाग : अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच कामांचे वाटप होऊन कामांना सुरु वात झाली आहे. ठेकेदार आणि अधिकाºयांच्या संगनमताने हा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी केला. बुधवारी जोग यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून या सर्व प्रकाराची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाची ३० जुलै रोजी, ‘रस्त्यांचे खड्डे बुजविण्याच्या कामाची निविदा’ प्रसिध्द झाली आहे. त्यात ८आॅगस्ट २०१७ पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. त्या ११ आॅगस्ट २०१७ ला उघडण्यात येवून त्यानंतर त्याच्या वर्कआॅर्डर्स देण्यात येणार आहेत. परंतु प्रत्यक्ष निविदा नोटीस प्रसिध्द होण्यापूर्वीच जबाबदार अधिकारी व ठेकेदारांनी मिळून ही कामे आपसांत वाटून घेवून प्रत्यक्ष कामे सुरू केली आहेत. याबाबत २६ जुलै रोजीच लेखी तक्र ार केली असल्याचे जोग यांनी सांगितले. वास्तविक पावसाळ्यापूर्वीच जे.सी.बी. ट्रक भाड्याने घेणे, मटेरियल जमवून ठेवणे, मजूर दैनंदिन तत्त्वावर घेणे याची निविदा काढणे शक्य होते, पण आपण वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. खड्डे भरण्याची कामे ही निकृष्ट दर्जाची करणाºया ठेकेदारांनाच पुन्हा दिली आहेत. कोणतीही देखरेख नसताना, निकृष्ट व चुकीचे मटेरियल वापरून कामे केली जाणार आहेत, बिले काढली जाणार आहेत. कामांवर कधीच माहितीचे फलक लावले जात नाहीत. खोटी मेजरमेंट रेकॉर्ड केली जातात, असेही जोग यांनी निवेदनात म्हटले आहे.आता निविदा प्रसिध्द होण्यापूर्वीच कामांची सुरु वात कशी झाली? रस्त्यांवर अधिकाºयांच्या संमतीशिवाय दगड-खडी टाकणे, रोलिंग करणे, जे.सी.बी.ने कामे करण्याचे प्रकार कसे सुरू झाले? असा प्रश्न त्यांनी केला. रेवस, रेवदंडा, रोहा मार्गावर जेसीबी, रोलरने काम केले जात आहे, रस्त्यांवर मटेरिअल टाकले आहे. त्याबाबत जबाबदार अधिकाºयांकडून नाहरकत घेतली जात नाही? या कामांवर सुपरव्हिजन कोण करणार? या कामांचे कोणते साहित्य आहेत? हे कळूच शकत नाही. कारण सर्व कामे अगोदरच वाटून घेतली आहेत. निविदांचा फक्त फार्स केला जात आहे. अधिकाºयांची निकृष्ट कामे करणाºया ठेकेदारांसह हातमिळवणी करून जनतेच्या कररूपी पैशांचा पुन्हा अपहार करीत आहेत. दरवर्षी हेच होत आहे. आता या कामाची रक्कम तीन कोटी सत्तेचाळीस लाख इतकी आहे.