शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

२ लाख ५६ हजार जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:52 IST

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या द्विवार्षिक अभियानामधून २ लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या द्विवार्षिक अभियानामधून २ लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या सहयोगाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी दोन वर्षांतून एकदा त्याच्या शेतजमिनीची मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. २०१७-१८ ते २०१८-१९ या द्विवार्षिक उपक्रमात जिल्ह्यात एकूण २५ हजार ६३३ नमुने काढण्यात आले. त्याद्वारे दोन लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. २०१९-२०मध्ये या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात आली. या १५ गावांतून चार हजार १६४ जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पाच गावांची निवड करून, तेथील मातीनमुने जमा करून जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अलिबाग येथील जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली.जमिनीचे आरोग्य चांगले राहिल्यास माणसाचे आरोग्य चांगले राहू शकते. राज्यातील पीक जमिनीपेक्षा रायगड जिल्ह्यातील मातीमध्ये सामू (पीएच) उत्ताम आहे. जिल्ह्यातील पीक जमीन उत्तम असून जमिनीत सेंद्रीयाचे प्रमाण चांगले आहे. आपल्या पुढील पिढीसाठी जमिनीची ही सुपिकता टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून त्याप्रमाणे पिकाचे नियोजन करावे यासाठी शासनामार्फत प्रचार आणि प्रसार सुरू आहे, अशी माहिती रायगड जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली.>माती परीक्षण का करावे?माती परीक्षण म्हणजे जमिनीची कमीत कमी वेळात केलेली रासायनिक व भौतिक तपासणी. यात साधारणपणे जमिनीचा सामू (पीएच), विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्बन, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार या अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण याबाबत माहिती मिळते, त्यानुसार पिकांच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो.>उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत मिळतेमाती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच, पण अन्नद्रव्यांवर होणाºया खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठीही मदत होते; म्हणून माती परीक्षण करून घेणे शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.