शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अल्प ठेवीदारांना पैसे वाटप

By admin | Updated: September 8, 2015 23:38 IST

गणेशोत्सवापूर्वी पेण अर्बन सहकारी को आॅपरेटिव्ह बँकेत जमा असलेल्या ४० कोटी रुपयांपैकी बँकेच्या अल्प ठेवीदारांना मंगळवारपासून पेण अर्बनच्या १८ शाखांमध्ये पैसे वाटप

पेण : गणेशोत्सवापूर्वी पेण अर्बन सहकारी को आॅपरेटिव्ह बँकेत जमा असलेल्या ४० कोटी रुपयांपैकी बँकेच्या अल्प ठेवीदारांना मंगळवारपासून पेण अर्बनच्या १८ शाखांमध्ये पैसे वाटप करण्यास सुरूवात झाली आहे. १० हजारांपर्यंतच्या ठेवी असलेले ठेवीदारांची संख्या सुमारे १ लाख ९३ हजारा ४३० असून या अल्प ठेवीदारांना तब्बल १८ कोटी रुपयांचे वाटप होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.२०१० पासून तब्बल साडेचार वर्षे निराशेने ग्रस्त ठेविदारांना आज दिलासा मिळाला. पेण अर्बनच्या १० हजाराच्यावर ते २ कोटीपर्यंत ठेवी असलेले ठेवीदार व पतसंस्था मिळून ५९ हजार ४७३ ठेवीदार आहेत. यांची एकूण ६१४ कोटी रुपये रक्कम वाटप होणे आहे. बँकेत वसूली झालेले ८० कोटीची पैकी प्रथम अल्प ठेविदारांना १८ कोटी रुपयांचे वाटप होत आहे. ठेविदाराच्या आडनावानुसार वेळापत्रक प्रशासक मंडळाने तयार केले असून ८ ते १२ सप्टेंबरपर्यंत या वाटपाचे नियोजन आहे. यामध्ये ८ सप्टेंबरला इंग्रजी ए ते ई या अक्षराने सुरु होणारे ठेवीदाराच्या आडनावे असलेल्यानाच पैशाचे वाटप बँकेच्या १८ शाखामधून करण्यात आले. ९ सप्टेंबरला एफ ते जे इंग्रजी अक्षरानुसार आडनावे येणारे ठेवीदार. १० तारखेला के ते ओ आक्षराची आडनावे, ११ तारखेला पी ते एस अद्याक्षराची आडनावे असलेले ठेवीदार तर १२ तारखेला टी ते झेड आद्याक्षराची आडनावे असलेले ठेवीदारांना पैशाचे वाटप होणार आहे. पैसे वाटपासाठीच्या प्रशासकीय मंडळात विजय म्हात्रे, नरेन जाधव, नरेंद्र साखरे, दिनेश चव्हाण, छगन गंडाळ, शरद जरे यांचा समावेश आहे. (वार्ताहर)खोपोलीत ठेवीदार संघर्ष समितीची सभा खोपोली : पेण अर्बन बँकेकडे परवाना नसतानाही न्यायालयाच्या आदेशानंतर १ लाख ३४ हजार ठेवीदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया आजपासून विविध शाखांमध्ये सुरू झाली आहे, हा ठेवीदारांच्या संघर्षाच्या विजयाचा पहिला टप्पा आहे.गेल्या ५ वर्षातील पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा लढा हा इतिहासात नोंद केला जाईल असा लढा आहे, असे प्रतिपादन संजय केळकर यांनी खोपोलीत केले.पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीची सभा खोपोलीत झाली, त्यावेळी ते बोलत होते.कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० हजारांपर्यंत ठेवी असणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम १२ सप्टेंबरपर्यंत सर्व शाखांमध्ये मिळणार आहे असे सांगून, ठेवीदार, खातेदारांनी आपले ओळखपत्र दाखवून, आपले धनादेश घेवून जाण्याचे आवाहन केले.