शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

सेना-भाजपा-आरपीआय महायुती, पत्रकार परिषदेमध्ये घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 02:36 IST

कर्जत नगरपरिषद निवडणूक : पत्रकार परिषदेमध्ये घोषणा

कर्जत : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २७ जानेवारी रोजी आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा-आरपीआय यांनी महायुती केल्याची घोषणा १० जानेवारी रोजी सायंकाळी पत्रकार परिषदमध्ये केली. गुरुवार, १० जानेवारीला छाननी होती. छाननी पार पडल्यानंतर बाजारपेठेतील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात ७ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. शिवसेना शहरप्रमुख भालचंद्र जोशी यांनी, २०१४ रोजी झालेल्या कर्जत नगरपरिषद निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र होतो. तीच युती आम्ही कायम करत आहोत.

कर्जत नगरपरिषदमध्ये परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने जनतेचा रेटा आहे, त्यामुळे आमची युती कायम आहे जागा वाटपाबद्दल तिन्ही पक्षांची चर्चा चालू होती आणि आमची चर्चा कोणाला समजू द्यायची नव्हती. आज छाननी झाल्यामुळे आम्ही ही युती जाहीर के ल्याचे सांगितले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर यांनी आम्ही तीनही पक्ष एकत्र आलो आहोत. नगरपरिषदेवर सत्ता मिळवण्याची सुवर्ण संधी आली आहे. या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश येईल. आम्ही एक आदर्श नगरपरिषद बनवू, असे सांगून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. नगरपरिषद हद्दीमध्ये उणिवा आहेत त्या पूर्ण करणार, आम्ही जातीवर राजकारण करत नाही. जे जातपात करतात ते बाद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल डाळींबकर यांनी मी आरपीआयमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो होतो, तेव्हा नवीन असताना मला पायघड्या घातल्या गेल्या. मात्र, नंतर त्या काढल्या जातात याच अनुभव मला आला आहे. येत्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष व नगसेवक निवडून आणून नगरपरिषदेची सत्ता मिळणार असे सांगितले. या वेळी सेनेचे शहरप्रमुख भालचंद्र जोशी, युवासेना जिल्हाधिकारी मयूर जोशी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, सचिव रमेश मुंढे, तालुका उपाध्यक्ष रमाकांत जाधव, शहराध्यक्ष अशोक ओसवाल, आरपीआयचे तालुका अध्यक्ष राहुल डाळींबकर आदी उपस्थित होते.जागा वाटप जाहीरनिवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा-आरपीआय यांची महायुती झाली आहे, यामध्ये नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेने घेतली आहे, तर नगरसेवकपदासाठी शिवसेनेला दहा जागा, भाजपाला सहा जागा व आरपीआयला दोन जागा असे वाटप करण्यात आले आहे. मात्र, आरपीआयचे दोन्ही उमेदवार हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा