शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीयांचा आज जेएनपीटीवर मोर्चा; संप मागे घेण्यास पोलीस, प्रशासनाचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:45 IST

जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात कामगार संघटनांनी सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यावर बुधवारी (१६) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

उरण : जेएनपीटीच्या विरोधात खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, बुधवारी जाहीर करण्यात आलेला  मोर्चा प्रशासन भवनावर धडकणार असल्याची माहिती कामगार नेत्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात कामगार संघटनांनी सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यावर बुधवारी (१६) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.  गेल्या तीन दिवसांपासून मोर्चा रद्द करण्यासाठी पोलीसांमार्फत जोरदार प्रयत्न सुरू होते. यासाठी डीसीपींच्या मार्गदर्शनाखाली कोविडचे कारण देत दोन दिवसांपासून जोर बैठकाही मारून झाल्या आहेत. मात्र कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचे म्हणणे धुडकावून लावत मोर्चा काढण्याचा निर्धार कायम ठेवला असल्याची माहिती कामगार नेते आणि जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील, रवींद्र पाटील यांनी दिली. खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे दोन्ही खासदार कामगारांना न्याय मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.कामगारांचा नकार कामगारांच्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर पोलीस आणि जेएनपीटी प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून मोर्चा रद्द करण्यासाठी पोलीसांमार्फत जोरदार प्रयत्न सुरू होते.  दबावतंत्रानंतरही कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरणाच्या विरोधात १६ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला मोर्चा मागे घेण्यास नकार दिला आहे. 

टॅग्स :JNPTजेएनपीटी