शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ !

By admin | Updated: February 4, 2017 03:04 IST

येथील प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकापचे आ. सुभाष पाटील, प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये शाब्दिक

अलिबाग : येथील प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकापचे आ. सुभाष पाटील, प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये शाब्दिक धुमश्चक्र ी उडाली. त्यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण होेते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी पाच, तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तीन असे एकूण आठ अर्ज दाखल झाले.अलिबाग तालुक्यातील थळ, शहापूर, कुर्डूस, चेंढरे जिल्हा परिषद गट आणि वरसोली, आंबेपूर, थळ पंचायत समिती गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेसाठी थळ जिल्हा परिषद गटासाठी मानसी दळवी, शहापूरमधून संदीप पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शेकापकडून शहापूर जिल्हा परिषद गटासाठी सुश्रुता (भावना) पाटील, कुर्डुस गटातून विद्यमान अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, चेंढरे जिल्हा परिषद गटातून विद्यमान सदस्या प्रियदर्शनी पाटील यांनी उमदेवारी अर्ज दाखल केले. अलिबाग पंचायत समितीच्या आंबेपूर पंचायत समिती गणातून शेकापकडून रचना म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून वरसोली गणासाठी उमेश नाईक आणि थळ गणासाठी गजानन बुंदके यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्याकडे दाखल केले.आॅनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होत होता. आॅनलाइनपेक्षा आॅफलाइन पद्धतच चांगली होती अशी चर्चा तेथे होती. दुपारी सव्वादोन वाजल्यानंतर शेकाप चे आ. सुभाष पाटील, अ‍ॅड.आस्वाद पाटील, संजय पाटील, अनंतराव देशमुख आणि शिवसेनेकडून महेंद्र दळवी, विजय कवळे, सुरेंद्र म्हात्रे आदी राजकीय नेते आपापल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गोंधळ उडालेला पाहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला. त्यामुळे अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे हे टीमसह प्रांताधिकारी कार्यालयात आले. पोलिसांच्या या अचानकपणे येवून दरडावण्याच्या प्रयत्नामुळे शेकाप कार्यालयीन चिटणीस आणि आमदार यांचा पारा चढला. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव सोनावणे आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे काही काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)भारती सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखलतळे : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी १ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तळा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ४३ महागाव गटातून भारतीय काँग्रेस पक्षातर्फे भारती सुर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजपर्यंत एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ नवले यांनी दिली. सहाय्यक म्हणून तहसीलदार भगवान सावंत, नायब तहसीलदार पराग कोडगुले काम पाहत आहे.कर्जत तालुक्यातून ६६ अर्जांची नोंदणीकर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरावयाचे आहे आणि त्यानंतर त्या नामनिर्देशनपत्राची प्रिंट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावयाची आहे.शुक्र वारपर्यंत कर्जत तालुक्यात संकेतस्थळावर ६६ जणांनी आपल्या उमेदवारी अर्जाची नोंद केली आहे, तर चार नामनिर्देशनपत्रे दाखल झाले. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद प्रभागाचे सहा गट आहेत तर पंचायत समिती प्रभागाचे बारा गण आहेत. २१ फेब्रुवारीला निवडणूक आहे. १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र भरावयाचा कालावधी आहे. १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद (गट) साठी २२ तर पंचायत समिती (गण) साठी ४४ अर्जांची अशा ६६ अर्जांची नोंद संकेतस्थळावर झाली आहे. मात्र ३ फेब्रुवारीला दुपारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून अ‍ॅड.गोपाळ शेळके यांनी बीड बुद्रुक (१४) जिल्हा परिषद गटामधून पहिले नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे सादर केले. भारिप बहुजन महासंघाचे सुनील देहू गायकवाड यांनी बीड बुद्रुक (२८) पंचायत समिती गणामधून आपले दोन नामनिर्देशनपत्र सादर केले. तर कळंब (१८) पंचायत समिती गणामधून शेतकरी कामगार पक्षाच्या रंजना प्रवीण पाटील यांनी आपले नामनिर्देशनपत्र सादर केले. शुक्रवारपर्यंत संकेतस्थळावर जिल्हा परिषद गटासाठी २२ तर पंचायत समिती गणासाठी ४४ अशा ६६ अर्जांची नोंदणी झाली आहे तर जिल्हा परिषद गटासाठी १ आणि पंचायत समिती गणासाठी ३ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोष्टी यांनी दिली.तीन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज नाहीआगरदांडा : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ याकरिता १ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरु वात करण्यात आली आहे. सलग तीन दिवस उलटून गेले तरी एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ या निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला. ६ फेबु्रवारीलाउमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. शेवटचे तीन दिवस बाकी आहेत. प्रत्येक पक्षामध्ये उमेदवार यादी निश्चित झाल्या नसल्याने उमेदवारांमध्येच चांगलीच घालमेल सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाच्या बैठका सुरूच असल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आय काँग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांची महाआघाडी होणार, तसेच शिवसेना व भाजपा पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरणार आहेत असे स्पष्ट झाले असले तरी कोणत्याच पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.म्हसळ्यात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज दाखलम्हसळा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेच्या शिलेदारांनी पहिले पाऊल ठेवले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी शुक्रवारी जल्लोषात जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेकडून वरवठणे जिल्हा परिषद गटासाठी रवींद्र लाड, पाभरे जिल्हा परिषद गटासाठी निशा पाटील, पाभरे पंचायत समिती गणासाठी हेमंत नाक्ती यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उर्वरित उमेदवार येत्या दोन दिवसात जाहीर करणार असल्याचे जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांनी सांगितले. यावेळी अर्ज दाखल करताना शिवसेना तालुका प्रमुख समीर बनकर, उपतालुका प्रमुख अनंत कांबळे, महामुनकर, गजानन शिंदे, विभाग प्रमुख संतोष पाखड, बंड्या विचारे आदींसह शिवसैनिक उपास्थित होते.पेणमध्ये नऊ अर्ज दाखलपेण: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी तीन तर पंचायत समिती गणासाठी सहा असे एकूण ९ अर्ज दाखल झाले. यामध्ये रावे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे वैकुंठ पाटील, पाबळ जिल्हा परिषद गटात रंजना अमोद मुंडे (काँग्रेस) तर जिते गटात शिवसेनेचे जगदीश कृष्णा ठाकूर यांनी अर्ज दाखल केले. पंचायत समिती गणात रावे सचिन मारुती पाटील, दादर संगीता रवींद्र मोकल, वाक्रुळ नम्रता नीलेश फाटक, सोनाली रमेश फाटक या काँग्रेसच्या तर सेनेतर्फे शिहू गणात सुनिता लक्ष्मण खाडेव, जिते गणात मालती वासुदेव म्हात्रे असे काँग्रेस शिवसेना आघाडीतर्फेएकू ण नऊ उमेदवारी अर्ज सादर केले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी अर्ज स्वीकारले.पोलादपूरमध्ये काँग्रेसचे अर्ज दाखलपोलादपूर : तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितींच्या जागांसाठी राष्ट्रीय काँग्रेसने शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाने एक जिल्हा परिषद गटासाठी तर दोन पंचायत समिती गणासाठी अर्ज दाखल केले. यावेळी माजी सभापती दिलीप भागवतसह नगरसेवक नागेश पवार, तालुकाध्यक्ष अनंत पार्टे आदि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलादपूर तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभय करगुटकर यांच्याकडे सादर केले. यावेळी तहसीलदार काशिनाथ नाडेकर उपस्थित होते. लोहारे जिल्हा परिषद गटासाठी मतदारसंघातून कृष्णा कदम याबरोबरच देवळे पंचायत समिती मतदार संघातून शैलेश सलागरे व लोहारे पंचायत समिती गणातून संजय जंगम यांचे उमेदवारी अर्ज सादर केले. पोलादपूर तहसील कार्यालयात उमेदवारांचे अर्ज दाखल करताना माजी सभापती दिलीप भागवत, नगरसेवक नागेश पवार, गायकवाड, तालुकाध्यक्ष अनंत पार्टे, बाबूराव महाडिक, यशवंत मोरे, वाडकर बुवा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.