लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अलिबाग ते सुडकोली रस्ता दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला निवेदन देवूनही अद्याप रस्त्याची डागडुजी न केल्याने संतप्त जनसेवा विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेने गुरुवारी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण केले. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरु स्तीचे काम पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला.जनसेवा विक्र म मिनीडोर चालक मालक संघटनेमार्फत सातत्याने अलिबाग ते सुडकोली मार्गाच्या दुरवस्थेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने या खड्ड्यांनी हैराण झालेल्या या मिनीडोर चालकांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक दिली. आपल्या व्यथा तेथील जबाबदार अधिकाऱ्यांपुढे मांडल्या, मात्र या उपोषणकर्त्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. खड्डे भरण्याचे आदेश आम्ही देऊ शकत नाही. तर त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते अशी कारणे सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी व्ही. बी. पाटील यांनी दिली. त्यातच नागाव-रेवदंडा रस्त्याचे काम सुरू असल्याने रेवदंडा मुरु डकडे जाणारी सर्व वाहतूक बेलकडे-वावे मार्गाने सध्या वळविण्यात आली आहे. तर येथील रस्त्यांची व त्यावरील मोऱ्यांची १५ टनाची क्षमता असताना जेएसडब्ल्यू कंपनीच्या ३० ते ३५ टनाच्या अवजड मालाची वाहतूक याच मार्गाने होत आहे. त्यामुळे अलिबाग ते सुडकोली या रस्त्याची दुर्दशा झाली.
अलिबाग - सुडकोली रस्त्याची दुरवस्था
By admin | Updated: May 12, 2017 01:53 IST