शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग आगाराला ‘अच्छे दिन’, मे महिन्यात ४.४० कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 11:15 IST

उन्हाळी सुटीत अलिबागमध्ये तब्बल ८ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वाधिक उच्चांकी उत्पन्न मिळविता आले आहे.

अलिबाग : उन्हाळी सुटीत पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात अलिबागची सफर केल्याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांबरोबरच अलिबाग बसस्थानक आगारालाही झाला आहे. केवळ मे महिन्यात प्रवाशांच्या भाड्यापोटी तब्बल ४.४० कोटींची कमाई केली असून तब्बल तीन  दशकानंतर ‘अच्छे दिन’ अनुभवता आले आहेत. उन्हाळी सुटीत अलिबागमध्ये तब्बल ८ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वाधिक उच्चांकी उत्पन्न मिळविता आले आहे.

अलिबाग एसटी आगार हे जिल्ह्याच्या मुख्यालयात शहरातील मुख्य बाजारपेठेत असून या ठिकाणाहून  रोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. वाढत्या पर्यटकांमुळे शिवशाहीसह अन्य एसटी बसेसना नेहमी गर्दी होत असते. संपलेल्या उन्हाळी सुटीमध्ये पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे  अलिबाग एसटी आगार हे मे  महिन्यात सर्वाधिक उत्पन्न देण्यात जिल्ह्यात अव्वल   ठरले. 

मे महिन्यात  आगारातून  शिवशाहीसह एकूण ८० बसेस प्रवाशांना घेऊन ७ लाख ८१ हजार किलोमीटर धावल्या.  येथून राज्याच्या विविध ठिकाणी बसमधून ८ लाख ४३ हजार प्रवाशांनी  प्रवास केला. त्यातून एकूण ४.४० कोटी उत्पन्न मिळाले. या प्रवाशांमध्ये ४१ टक्के महिलांनी म्हणजे ३.४८ हजार किमी प्रवास केला. त्यांना तिकिटावर ५० टक्के सवलत असल्याने जवळपास १.६० कोटी रुपये मिळाले.  

एकजुटीचे फळ : अलिबाग आगाराचे उत्पन्न वाढीसाठी चालक, वाहक यांचे मोलाचे सहकार्य यासाठी लाभले आहे. अनेकांनी सुट्टी न घेता आपली सेवा बजावली आहे. तसेच बसेस  नादुरुस्त न ठेवता त्या प्रवाशाच्या सेवेत उत्तम राहण्यासाठी यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी  सहकार्य केले आहे.  अलिबाग एसटी आगाराच्या सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी एकीचे सामर्थ्य दाखवून उत्पन्न वाढीस मोलाची साथ दिली आहे. 

अलिबाग आगाराला ३० वर्षांनी पहिल्यांदाच एका महिन्यात कोट्यवधींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. हे यश चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने मिळाले आहे. त्यामुळे उत्कृष्ट सेवा देण्यासाठी  आगाराची जबाबदारी अजूनच वाढली आहे. - ए.व्ही. वनारसे, अलिबाग आगार व्यवस्थापक

टॅग्स :alibaugअलिबाग