शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्येच्या निषेधार्थ आज अलिबाग बंद ; शहराला छावणीचे रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 02:56 IST

शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

अलिबाग : शहरात गोहत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने बुधवारी अलिबाग बंदची हाक दिली आहे. त्याला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने अलिबाग शहरातील दैनंदिन व्यवहारांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. बंदमुळे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात येणार असल्याने शहराला पोलीस छावणीचे रूप येणार असल्याचे बोलले जाते.शुक्र वार २७ जुलै रोजी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला परिसरात गोहत्या करून तिचे मांस विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. या प्रकरणी अब्दुस सय्यद, शराफत फकी आणि इंद्रीस चौधरी यांना अटक करु न न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तीनही आरोपींना बुधवार, १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याच दिवशी शहरामध्ये बंद पुकारण्यात आला आहे.गोमांस विक्रीमुळे विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. अलिबाग शहर हे शांतताप्रिय शहर आहे. या ठिकाणी सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन विविध सण साजरे करण्याची परंपरा आहे.त्यामुळे शहरामध्ये गोहत्येसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी अलिबाग बंदची हाक दिली आहे. शहरातील जैन संघटना, सनातन भारत, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध व्यापारी संघटनांनी भाजपाने पुकारलेल्या अलिबाग बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच बंदमध्येही त्या सहभागी होणार असल्याने बाजारपेठेतील विविध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे.बंद पाळण्यासाठी कोणावरही निर्बंध नाहीत, परंतु जास्तीतजास्त नागरिकांनी, आस्थापनांनी बंदमध्ये सामील होऊन सहकार्य करावे, बंद शांततेमध्ये पाळण्यात यावा असे, आवाहन भाजपाचे नेते अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केले आहे.व्यापाºयांच्या लाखोंच्या उलाढालीवर परिणामअलिबाग शहर हे पर्यटकांच्या पसंतीचे शहर आहे. त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. पर्यटकांच्या जीवावरच येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल इंडस्ट्री, रेस्टॉरंट, लॉजिंग, कॉटेजेस, ट्रॅव्हल्स यासह अन्य छोटे-मोठे उद्योगधंदे तग धरु न आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमार्फत रोजची लाखो रु पयांची उलाढाल होत असल्याने एक दिवसाच्या बंदमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे बोेलले जाते.शहरामध्ये विविध असणारी किराणा मालाची दुकाने, कपडा मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजारातील आर्थिक उलाढालही प्रचंड मोठी आहे. त्या व्यवसायावरही बंदचा परिणाम होण्याची शक्यता आहे.विविध शाळा, महाविद्यालये,बँका, सरकारी, निम सरकारी आस्थापनांना बंदची विशेष झळ बसणार नाही. असे असले तरी दैनंदिन कामांसाठी नागरिक बाहेर पडणार का हाच मोठा प्रश्न आहे.एसटी बंदमध्ये सहभागी होणार नाही. अलिबाग आगारातून नियमित गाड्या सोडण्यात येतील, मात्र आंदोलकांनी गाड्या अडवल्यास नाईलाजाने आम्हाला गाड्या सोडता येणार नाही, असे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले.शहरामध्ये १ आॅगस्ट रोजी भाजपाने बंदची हाक दिलेली आहे. आंदोलकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.- दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक, अलिबागअलिबागचे नागरिक सुज्ञ आहेत. त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, तसेच समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे- प्रशांत नाईक,नगराध्यक्ष, अलिबाग

टॅग्स :Raigadरायगड