शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग ३५.६ अंशावर; उष्ण वारे कारणीभूत : कोकण विभागात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:51 IST

मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत

बोर्ली मांडला : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र उन्हाच्या झळा सोसत आहे. कोकण विभागात अलिबाग येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग येथे शनिवारचे तापमान हे ३५.६ एवढे आहे. उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.सौराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्रात अ‍ॅण्टीसायकलॉन म्हणजेच प्रतिचक्रवाती वारे निर्माण झाल्याने पारा चढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गुजरातच्या दिशेने आलेले उष्ण वारे मुंबईत घुसल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. पुढचे तीन दिवस असेच वातावरण असेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यभरात अनेक भागांत तयार झालेले उष्ण वारे बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे हे वारे जमिनीवरून वाहत आहेत. परिणामी, जमीन भट्टीप्रमाणे तापली असून, डांबरही अक्षरश: वितळले आहे. अलिबागचे किमान तापमान हे ३१.८ एवढे असते. मात्र, शनिवारी अलिबाग येथे ३५.६. डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे. अलिबाग येथे तापमान वाढल्याने उन्हाचे चटके अधिक बसत आहेत. येत्या दोन दिवसांत तापमान हे वाढणार असल्याचे अजयकुमार यांनी सांगितले आहे.विदर्भात चार दिवस उष्णतेची लाटविदर्भात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून काही ठिकाणी वळीवाचा पाऊसही होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूरमध्ये ४४़२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे़मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत, असे मुंबई कुलाबा येथील हवामान विभागाचे वैज्ञानिक अजयकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Temperatureतापमान