शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

अलिबागकरांनी पकडली ४३ मोकाट गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:14 IST

शहरात गोहत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याविरोधात अलिबागमधील नागरिक एकत्र आले असून त्यांनी शहरातील तब्बल ४३ मोकाट गुरांना पकडून नगर पालिकेच्या ताब्यात दिले.

अलिबाग : शहरात गोहत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याविरोधात अलिबागमधील नागरिक एकत्र आले असून त्यांनी शहरातील तब्बल ४३ मोकाट गुरांना पकडून नगर पालिकेच्या ताब्यात दिले. गुरे पुन्हा रस्त्यावर फिरताना दिसल्यास त्या गुरांना पकडून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विविध सामाजिक संघटनांना देणार असल्याने गुरांच्या मालकांना आता गुरे रस्त्यावर सोडून देणे महागात पडणार आहे.अलिबाग शहरामध्ये भटक्या गुरांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्यामध्ये सुमारे २० गुरे एका वेळेला विविध ठिकाणी बसलेले असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. काही वेळेला तर गुरांची झुंज लागल्याने ते रस्त्यावर सैरावैरा पळत सुटतात. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.अलिबाग हे पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. मोकाट गुरांचा त्यांनाही त्रास होत असतो. काही पर्यटकांना तर बैलांनी शिंगावर घेऊन उडवल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शिवाय गुरांच्या मलमुत्रामुळे शहरामध्ये अस्वच्छता पसरते. यामुळे अलिबागकर नागरिक आणि पर्यटक कमालीचे हैराण झाले होते. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत अलिबाग नगर पालिका प्रशासन गंभीर असल्याचे दिसून येत नव्हते. काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत तक्र ारी केल्या होत्या. मात्र त्यांच्या तक्र ारींची फारशी दखलही घेतली जात नसल्याने नागरिकांनी कंटाळून तक्र ारी करणे सोडले होते. गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी अलिबाग नगर पालिकेकडे स्वत:च्या मालकीचा कोंडवाडा नाही. सध्या श्रीबाग परिसरामध्ये कोंडवाडा उभारण्यात आला आहे. मोकाट गुरे पकडण्यासाठी नेमलेल्यांकडून सातत्याने गुरे पकडली जात नव्हती. त्यामुळे शहारमध्ये बिनबोभाट गुरे फिरताना दिसतात.अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला परिसरामध्ये शुक्र वारी गोहत्या करणाºयावर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना पकडून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर खºया अर्थाने मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलीस ठाण्यात याप्रकरणी जोरदार चर्चा झाल्यानंतर ही बाब नगर पालिकेची असल्याने हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, असे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले. त्यानंतर अलिबागमधील नागरिक, विविध हिंदुत्ववादी संघटना, भाजपा या राजकीय पक्षाने थेट अलिबागचे मुख्याधिकारी यांना शुक्र वारी घेराव घालून याबाबतचा जाब विचारला. नगर पालिकेला मोकाट गुरांचा बंदोबस्त करता येत नसेल तर आम्ही करतो, असे सर्वांनी मुख्याधिकारी महेश चौधरी यांना सुनावले. त्यानंतर शुक्र वारी आणि शनिवारी रात्री मोकाट गुरांची धरपकड करण्यात आली.अलिबाग एसटी स्टॅण्ड, समुद्रकिनारा, आरडीसी बँक, डंपिंग ग्राउंड, बायपास रोड, अलिबाग जुने भाजी मार्केट, पोस्ट आॅफिस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक यासह अन्य ठिकाणाहून ४३ गुरांना पकडून श्रीबाग येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी चौधरी, पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, भाजपाचे महेश मोहिते, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि अलिबागकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पकडण्यात आलेल्या ४३ गुरांना तीन दिवसांच्या आत त्यांच्या मालकाने घेऊन जाणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्या गुरांचा ताबा नगर पालिकेकडे राहतो. अलिबागमधील नागरिकांनी मोकाट गुरे नगर पालिका प्रशासनाला पकडून दिली आहेत.तीच गुरे पुन्हा रस्त्यावर दिसल्यास त्यांना पकडून त्या गुरांना त्यांच्या मालकाच्या स्वाधीन केले जाणार नाही, असे भाजपाचे नेते अ‍ॅड.महेश मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्या गुरांच्या पालनपोषणाची जबाबदारी विविध संघटना वाटून घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raigadरायगड