शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागला आता अखंडित वीज; भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 23:53 IST

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेअंतर्गत ८९ कोटी खर्च

अलिबाग : शहरात आता यापुढे विजेचे खांब पडणार नाहीत; अथवा वीजपुरवठाही खंडित होणार नाही. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प योजनेअंतर्गत भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तब्बल ८९ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च येणार आहे.जिल्ह्यात चक्रीवादळामुळे ३ जूनला विजेचे खांब, तारा तुटून मोठ्या प्रमाणात महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. १९०५ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. अद्यापही शेकडो गावांतील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. अलिबाग शहरामध्ये जिल्हा सरकारी रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा न्यायालय, जिल्हा कोषागार यांसह अन्य प्रमुख सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वीजपुरवठा होणे गरजेचे आहे.राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प योजनेअंतर्गत भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचे काम आता अलिबागमध्ये सुरू करण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वीपासून प्रकल्प रखडला होता. मात्र आता या कामाला गती आली आहे. या प्रकल्पासाठी ८९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ४५ किमी लांबीची उच्च दाबाची वीजवाहिनी तर ५५० किमी लांबीची लघुदाब वीजवाहिनी जमिनीतून टाकण्यास लिना पॉवर टेक कंपनीने सुरुवात केली आहे. अलिबाग शहर, चेंढरे ग्रामपंचायत आणि वरसोली ग्रामपंचायतीचा काही भाग या योजनेत समाविष्ठ करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे २० हजार ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे. अलिबाग पंतनगर येथून जमिनीतून वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. २४ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीवर आहे, असे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अद्ययावत यंत्राद्वारे हे काम सुरू आहे. पावसाळ्यातही हे काम सुरूच राहणार असल्याचे तपासे यांनी स्पष्ट केले.नवीन सबस्टेशन बंदअलिबाग-चेंढरे येथे अत्याधुनिक सबस्टेशन उभे करण्यात येणार आहे. सर्वसामान्यत: सबस्टेशन ही खुली असतात. मात्र नवीन सबस्टेशन हे बंद असणार आहे. त्यामुळे धोका कमी होणार आहे.