शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अल कार्गो कामगारांचा उरण तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: June 21, 2017 05:43 IST

येथील अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर सीएफएसमधील १५० कंत्राटी कामगारांना कमी करून कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : येथील अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर सीएफएसमधील १५० कंत्राटी कामगारांना कमी करून कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी कुटुंबीयांसमवेत मंगळवारी तहसील कार्यालयावरच मोर्चा काढला. भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, अशी मागणी या वेळी मोर्चेकऱ्यांनी उरण तहसीलदारांकडे केली.तालुक्यात कोप्रोली येथे अल कार्गो लॉजिस्टिक कंटेनर फ्रं ट स्टेशन आहे. कंटेनर आयात-निर्यात होणाऱ्या कंटेनर लॉजिस्टिकमध्ये सध्या ३५० कामगार काम करीत असून सुमारे २५० कामगार ठेकेदारीत काम करीत आहेत. केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणामुळे कंटेनर बंदरातून थेट आयात-निर्यात होऊ लागल्याने कंटेनर हाताळणीचे काम कमी झाल्याचे सांगत ठेकेदार कंपनीने कामगार कपातीचे धोरण अवलंबिले आहे. तसेच कंपनीच बंद करण्याच्या निर्णयाप्रत मालकवर्ग येवून ठेपला आहे. तसेच ठेकेदारीत काम करणाऱ्या १५० कामगारांना कमी करण्याबाबत नोटिसाही देण्यात आल्या आहेत. यामुळे कामगारांनी २३ जूनपासून कंपनीविरोधात बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र आंदोलनाला कंपनीचे मालक शशिकांत शेट्टे आणि आदर्श हेगडे यांनी दाद दिली नसल्याने मंगळवारी (२०) कंपनी व्यवस्थापनाने घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मंगळवारी (२०) तहसील कार्यालयावरच मोर्चा काढला. यामध्ये महिला, मुलांचाही समावेश होता. मोर्चेकऱ्यांनी कंपनीच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणा दिल्या.यावेळी शिष्टमंडळाने उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनाही निवेदन देवून चर्चा केली. यावेळी अल कार्गो कंपनीचे अंबादास यादव, राजेंद्र श्रीवास्तव, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, राजिप सदस्य विजय भोईर, माजी राजिप सदस्य वैजनाथ भोईर, रुपेश पाटील, किरीट पाटील, जे. डी. जोशी, सीमा घरत इतर मान्यवर उपस्थित होते. कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, राजिप सदस्य विजय भोईर, माजी राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, रुपेश पाटील आणि कामगार प्रतिनिधींनी कामगारांच्या व्यथा मांडून कंपनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या, अन्यथा प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा, अशी मागणी कामगारांच्या वतीने शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे केली. शिष्टमंडळ आणि कंपनी प्रशासन अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेवून मालकांशी चर्चा करून कामगारांच्या न्याय हक्काचा २२ जूनपर्यंत निर्णय घेण्याची तंबी उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिली आहे.