शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत फटाके व्यवसायात मंदीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 00:21 IST

Diwali : या सणावारांच्या वेळेस काेणी पणत्या, दिवे, फराळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाेभेचे व आतषबाजीचे फटाके यांचा व्यवसाय करतात.

माणगाव :  भारतासह महाराष्ट्रात आलेल्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील अनेकांचे उद्योगधंदे बुडाले, शासनाकडून टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या अनलाॅकमुळे व्यापारी वर्ग तर सुखावला. मात्र, आर्थिक कुंचबणेमुळे ग्राहक संख्येत मात्र घट झाली अशातच दसऱ्यानंतर दिवाळी आली. मात्र, या वर्षी फटाके बाजारात मंदी दिसते आहे.या सणावारांच्या वेळेस काेणी पणत्या, दिवे, फराळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाेभेचे व आतषबाजीचे फटाके यांचा व्यवसाय करतात. मात्र, दरवर्षीप्रमाणे फटाके खरेदीकरिता असणारा उत्साह मात्र या वर्षी कुठेच दिसून येत नसल्याचे माणगांवातील बहुसंख्य किरकाेळ व घाऊक फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे, अशातच एकामागाेमाग शेतीवर येणाऱ्या संकटामुळे काेकणी शेतकरीही हैराण झाल्यामुळे या वर्षी दिवाळी साजरी करावी की नाही, या संभ्रमात नागरिक असल्याचे दिसत आहे.दरवर्षी दिवाळीच्या पूर्व आठवड्यात ग्राहकांची फटाके खरेदी करण्याकरिता ओढ असायची. मात्र, या वर्षी खुद्द फटाक्यांच्या घाऊक व्यापाऱ्यांना ग्राहकांची वाट पाहत बसण्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत सर्व गाेष्टी पाहता या वर्षी फटाका व्यावसायिकांवरही मंदीचे सावट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरवर्षीप्रमाणे फटाक्यांना ग्राहक पसंती देत नसल्याचे चित्र आहे. दरवर्षी या आठवड्यात आमच्या हाेलसेल विक्रेत्याकडेही लाइन लागलेली असते. मात्र, या वर्षी अशी परिस्थिती कुठेच दिसून आली नाही. तरीदेखील आम्ही फटाके ग्राहकांना परवडतील अशाच किमतीत ठेवले आहेत.- शिल्पा पटवा-राजपूरकर,     फटाके विक्रेते     माणगांव 

टॅग्स :Raigadरायगड