शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक सांडपाण्यामुळे शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:03 IST

अंबा नदीलगत असणाऱ्या सांडपाणी वाहिनीला गळती लागली असून, त्यातील दूषित पाणी शेतात पसरत आहे.

- राजू भिसे नागोठणे : अंबा नदीलगत असणाऱ्या सांडपाणी वाहिनीला गळती लागली असून, त्यातील दूषित पाणी शेतात पसरत आहे. त्यामुळे भातशेती जळून जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत मोकल यांच्यासह संबंधित शेतकºयांनी केला आहे. संबंधित प्रतिनिधीने या जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्यात तथ्य आढळून आले आहे. गळतीमुळे परिसरात दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. ही वाहिनी शेजारील रिलायन्स कंपनीची असल्याचे स्पष्ट होत असल्याने याबाबत संबंधित अधिकाºयाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ न शकल्याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी फुटणाºया या सांडपाणी वाहिनीच्या फुटीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.विभागातील शिहू, मुंढाणी, आटिवली, गांधे, चोळे, झोतीरपाडा, तरशेत, जांभुळटेप आदी गावांतील शेतकºयांच्या बहुतांशी जमिनी पूर्व बाजूला असणाºया अंबा नदीलगत आहेत. येथील रिलायन्स कंपनीची रसायनमिश्रित दूषित पाणी वाहून नेणारी वाहिनी याच भागातून गेली असल्यामुळे ती वारंवार फुटत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. कंपनीकडे वारंवार तक्र ार करीत असलो तरी, ते कायम दुर्लक्ष करीत असल्याचे ते सांगतात. पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचत असल्याने हे दूषित पाणी शेतात पसरते आणि नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात.नदीत किंवा खाडीतसुद्धा हे पाणी पसरत असल्यामुळे होणाºया प्रदूषणामुळे मिळणाºया मासळीला रासायनिक दुर्गंधी येत असल्याने मच्छीमार संकटात सापडले असल्याचे मोकल यांचे म्हणणे आहे. मुंढाणी येथील शेतकºयाने सांगितले की, जून महिन्यात भाताची केलेली लागवड या दूषित पाण्यामुळे जळून गेल्यामुळे जुलैच्या अखेरीस दुसºयांदा लागवड केली होती. मात्र, माझे शेताच्या ५० मीटर अंतरावर पुढे ही वाहिनी फुटली असल्यामुळे तिकडच्या शेतातील दूषित पाणी माझ्या शेतात वाहून आल्यामुळे दुसºयांदासुद्धा शेतीची वाट लागली असून, आता दाद मागायची तरी कोणाकडे, असा सवाल त्यांनी संबंधित प्रतिनिधीकडे व्यक्त केला. वेळोवेळी सांगूनसुद्धा कंपनी आमच्याकडे दुर्लक्षच करीत असल्याने सर्व शेतकºयांना घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे मोकल यांनी या वेळी स्पष्ट केले.