शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाविरोधात आंदोलन : जिल्ह्यातील सरकारी बँका बंद असल्याने ग्राहकांचे हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 09:11 IST

शासकीय बँकांचाही खासगीकरण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. याविरोधात देशातील सर्व शासकीय बँक कर्मचाऱ्यांनी १५ व १६ मार्च असे दोन दिवस बँक बंद आंदोलन सुरू केले आहे.

 

अलिबाग : केंद्र सरकार फायद्यात असणारे उद्याेग, विमा कंपन्यांपाठाेपाठ आता सरकारी बँकांचेही खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या धाेरणाला विराेध करण्यासाठी देशातील सर्व सरकारी बँका १५ आणि १६ मार्च राेजी बंदची हाक दिली आहे. त्याला पहिल्याच दिवशी रायगड जिल्ह्यातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी  कामकाज बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सरकारी बँका बंद असल्याने ग्राहकांचे मात्र चांगलेच हाल झाो. खासगी बँकांचे व्यवहार सुरळीत सुरू हाेते.

शासकीय बँकांचाही खासगीकरण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. याविरोधात देशातील सर्व शासकीय बँक कर्मचाऱ्यांनी १५ व १६ मार्च असे दोन दिवस बँक बंद आंदोलन सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील २७० बँक शाखा दोन दिवस बंद राहणार असून पाच हजार अधिकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सोमवारी अलिबाग येथील युनियन बँकेसमोर या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

खातेदार आपली जमवलेली पुंजी ही सेव्हिंग, फिक्स डिपॉझिट खात्यात ठेवत असतो. अनेक खासगी बँका या आर्थिक घोटाळ्यामुळे बंद झाल्या आहेत. त्यामुळे शासकीय बँकेवर आजही ग्राहकांचा विश्वास आहे. त्यामुळे या बँका आजही ग्राहकांप्रति आपला विश्वास टिकून आहेत. मात्र केंद्र सरकार आता या शासकीय बँकेचे खासगीकरण करत आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेला बँक अधिकारी, कर्मचारी यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बँक अधिकारी, कर्मचारी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.

रायगड जिल्ह्यातील २७० बँकेच्या शाखा १५ व १६ मार्च असे दोन दिवस बंद राहणार आहेत. या शाखेतील पाच हजार अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन, एआयबीओसी, एआयबीइए या बँक संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे. दोन दिवस बँक बंद राहणार असल्याने याचा फटका हा ग्राहकांना बसणार आहे. केंद्र सरकारच्या विरोधात अलिबाग युनियन बँकेसमोर बँक अधिकारी, कर्मचारी यांनी निदर्शने करून घोषणाबाजी केली आहे.

खासगीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम पनवेलमध्ये दिसून आला. दरम्यान, कोरोनामुळे आंदोलन आणि निदर्शने करण्यास बंदी असल्याने कर्मचाऱ्यांकडून शाखांसमोर गटागटांत घोषणाबाजी करण्यात येत आहे. 

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ग्राहकांना -- तळा : बँक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या खासगीकरणा विरोधात पुकारलेल्या संपाचा फटका ग्राहकांना बसला आहे. १३ मार्च रोजी दुसरा शनिवार व रविवार असे दोन दिवस सुट्टी व त्यानंतर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस संपामुळे बँका बंद असल्याने सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. याचा फटका बँकेच्या ग्राहकांना बसला असून बँकेतून पैसे काढता येत नसल्याने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे कोठून आणायचे या विवंचनेने नागरिक हैराण झाले आहेत. 

- शनिवार व रविवार सुट्टी असल्याने सोमवारी नागरिकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली. मात्र सोमवार व मंगळवार असे दोन दिवस संपामुळे बँक बंद असल्याचे समजल्याने बाजारात खरेदीसाठी पैसे कोठून आणायचे हा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला. - बँक बंद असली तरी बँकेने एटीएम सेवा सुरू ठेवली होती. यामुळे सुशिक्षित नागरिकांची अडचण दूर झाली. मात्र तळा हा दुर्गम तालुका असल्याने तसेच तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांना एटीएमचे ज्ञान नसल्याने पैशांअभावी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. - शिमगा जवळ आल्याने मुंबईतील चाकरमानी शिमग्याला मोठ्या संख्येने गावाकडे परतत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी गावाकडचे नागरिक आपल्या घरात सर्व जीवनावश्यक वस्तू खरेदी करून ठेवतात. यामुळे तळा बाजारपेठेत सोमवारी तालुक्यातील नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली; मात्र संपामुळे सरकारी बँका बंद असल्याकारणाने पैशांअभावी नागरिकांना रिकाम्या हाताने आपल्या घरी परतावे लागले.