शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचे भाव घसरल्याने आंदोलन; दूध उत्पादक, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 23:36 IST

अलिबागमध्ये तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

अलिबाग : दूध उत्पादक आणि शेतकरी अर्थिक संकटात सापडले असून, दुधाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सोमवारी राज्यव्यापी दूध आंदोलन केले. अलिबागमध्येही भाजपने तहसीलदार सचिन शेजाळ यांना निवेदन देऊन आंदोलन केले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लीटर १० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, तसेच गाईच्या दुधाला ३० रुपये दर द्यावा, या मागण्यांसाठी राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन, आंदोलन करण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांनी घेतला होता.

महाराष्ट्रातील दुधाचे भाव १६ ते १८ रुपयांपर्यंत घसरले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. या शेतकºयांना दुधाला योग्य तो दर मिळत नाही. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकºयांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठरावीक दूध संघापुरतेच मर्यादित असून, राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे, अशी भावना महायुतीतील घटक पक्षांनी व्यक्त केली. या आंदोलनातून जर काही निष्पन्न झाले नाही, तर येत्या १ आॅगस्ट रोजी मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

अलिबाग तहसीलदारांना सोमवारी आंदोलनाचे निवेदन देताना, भाजप अलिबाग शहर अध्यक्ष अंकित बंगेरा, तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ.गणेश गवळी यांनी दुधाची पिशवी देऊन आंदोलन केले.

अनुदानाची मागणी

दासगाव : गायीच्या दुधाला १० रुपये अनुदान आणि पावडरच्या दुधाला ५० रुपये अनुदान द्या, अशी मागणी महाडमधील भाजपच्या वतीने करण्यात आली. मागणी पूर्ण झाली नाही, तर आंदोलनचा इशारा दिला. या प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, महेश शिंदे, चंद्रजित पालांडे, श्वेता ताडफळे, मंजुषा कुद्रीमोती, अ‍ॅड.अदित्य भाटे आदींन महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले.

टॅग्स :alibaugअलिबागmilkदूध