शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार मतदारांचे वय नव्वद वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:56 IST

जिल्ह्यात १५ हजार नवीन मतदारांची नोंदणी; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न

- निखिल म्हात्रेअलिबाग : आगामी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेत महसूल विभागाने कंबर कसली होती. जिल्ह्यात सुमारे १५ हजार नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. आता जिल्ह्यात ११ लाख ७९ हजार ९६५ पुरुषांनी तर ११ लाख ४० हजार १८५ स्त्रियांची मतदार नोंदणी पूर्ण झाली असून यामध्ये नव्वदी पार केलेले १ हजार ७४ मतदार ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात नवीन मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.जिल्ह्यात मतदार पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आला असून त्याअंतर्गत नवीन नाव नोंदणी, तसेच नावे वगळणे, दुबार नावे छाननी व वगळणे अशी कामे सुरू आहेत. नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आदिवासी पाड्यांवर जाऊन नाव नोंदणी करणे, प्रत्येक महाविद्यालयातील नव मतदारांची नाव नोंदणी करणे आदी कामांसाठी प्रत्येक महाविद्यालयात एक अध्यापक नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या आस्थापनांकडून माहिती मागवून त्यांच्या कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी, काम सोडून गेलेल्यांची पत्ता बदललेल्यांची नावे वगळणे, जिल्ह्यातील सुमारे ३ हजार गृहनिर्माण संस्थांच्या संचालकांमार्फत त्या त्या संस्थेतील मतदारांची नोंदणी, स्थलांतरितांची नावे वगळणे, नावात बदल आदी कामे होत आहेत. नवीन मतदार नोंदणीसाठी या अभियानात आतापर्यंत ३६ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यावर सध्या काम ही सुरू आहे.तालुकानिहाय नव्वदीपार मतदारकर्जत    ३८२उरण    ८१पेण    २६५अलिबाग    ३३३श्रीवर्धन    १२एकूण    १,०७४१५ हजार नवमतदारसन २०२० मध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक, युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १५ हजार ९२० नवमतदारांनी नोंदणी केली आहे. या नवमतदारांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.