शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

आगरदांडा जेट्टीवर स्वच्छतागृहच नाही !

By admin | Updated: September 13, 2016 02:37 IST

तालुक्यातील आगरदांडा जेट्टीवर मेरीटाईम बोर्डाने तोडलेल्या स्वछता गृहाच्या जागी तातडीने स्वच्छता गृह बांधावे आणि प्रवाशांची होणारी कुंचबणा थांबवावी अशी

नांदगाव / मुरूड : तालुक्यातील आगरदांडा जेट्टीवर मेरीटाईम बोर्डाने तोडलेल्या स्वछता गृहाच्या जागी तातडीने स्वच्छता गृह बांधावे आणि प्रवाशांची होणारी कुंचबणा थांबवावी अशी आग्रही मागणी आगरदांडा ग्रामपंचायत उपसरपंच बाबासाहेब अर्जबेगी यांनी केली आहे. मुरूडसह श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांना जोडणारी सतत प्रवाशांची वर्दळ असणारी आगरदांडा ही महत्त्वाची जेट्टी म्हणून गणली जाते. ऐतिहासीक जंजिरा किल्ला, दिवेआगारचे सुवर्ण गणेशमंदिर, श्रीमंत पेशव्यांचे श्रीवर्धन, दक्षिण काशी म्हणून मान्यता असलेल्या हरिहरेश्वर तसेच समुद्र किनारे पाहण्यासाठी जंगल जेट्टी तसेच प्रवासीजल वाहतूक सेवा वर्षभर आगरदांडा ते दिघी अशी सुरु असते. त्यामुळे शेकडो पर्यटकांची वर्दळ बंदरावर असते. परंतु येथिल स्वछतागृह मेरीटाईम बोर्डाच्या आदेशाने पाडण्यात आले असून त्या जागी पोलीस गस्तीसाठी गेस्टरुम उभारले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांची विशेषत: महिलांची स्वच्छता गृह नसल्याने कुंचबणा होत आहे. प्रसंगी महिला प्रवाशांना आयसीआयसी कोस्टगार्डच्या शौचालयाचा वापर करणे भाग पडते. मेरी टाईम बोर्डाचे सर्व सोयींनी युक्त कॉर्पोरेट टच आॅफीस उद्घाटनाअभावी रखडले आहे. बंदर आधिकारी धोत्रे यांच्याशी संपर्कसाधला असता उदघाटनाविषयी वरिष्ठच आधिकृत काय ते सांगू शकतील असे ते म्हणाले. सुवर्ण दुर्ग शिपींग कं . तसेच दिघी जलप्रवासी वाहतूक कंपन्या प्रवाशांची तसेच अवजड वाहनांची ने-आण आगरदांडा ते दिघी बंदर सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत करीत असतात. तथापि पर्यटक तसेच स्थानिकांची वर्दळ मोठया प्रमाणावर असूनही स्वछते कडे दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी मेरीटाईम बोर्डाने स्वच्छता गृहाची व इतर सुविधांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.