शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर ‘रास्ता रोको’ मागे

By admin | Updated: May 24, 2017 01:24 IST

आगरदांडा ते सावली या रस्त्याची चाळण झाल्याने तो रस्ता नव्याने बनण्यासाठी सोमवारी मुरुड आगरदांडा येथे कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समिती

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : आगरदांडा ते सावली या रस्त्याची चाळण झाल्याने तो रस्ता नव्याने बनण्यासाठी सोमवारी मुरुड आगरदांडा येथे कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समिती मुरु डतर्फे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. त्या वेळी तहसीलदार योगिता कोल्हे यांनी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष व पंचक्रोशीतील नागरिकांशी चर्चा करून तहसीलदारांच्या तोंडी आश्वासनानंतर ‘रास्ता रोको’ आंदोलन तात्पुरते मागे घेतले.बांधकाम खात्याचे सहायक अभियंता नीलेश खिलारे या ठिकाणी आले. त्या वेळी संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालून, एक किलोमीटरच्या आसपास त्यांना त्याच रस्त्यावरून चालत नेऊन या रस्त्याविषयी प्रश्नांचा भडिमार के ला. या ठिकाणी असणारे पर्यटक किरण शिंदे (नाशिक) व महसुद राजपूरकर (श्रीवर्धन) यांनीही या रस्त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत आंदोलन होत नाही, तोपर्यंत रस्ते बनणार नाही का? असा प्रश्न बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला. आगरदांडा ते सावली रस्ता हा गेली १२ वर्षे नव्याने बनवला नाही व त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून छोटे-मोठे अपघात झाले आहेत, तरी बांधकाम खात्याला जाग येत नाही. या रस्त्यावरून गरोदर महिलांना प्रवास करणे जड झाले आहे. काही महिलांची प्रसूती मिनीडोर रिक्षामध्येच झाली होती, त्याकरिता हा रस्ता नव्याने बनविण्यासाठी गेली तीन वर्षे कुणबी समाजातर्फे निवेदने देण्यात आली. मात्र, त्या निवेदनाचा काही परिणाम बांधकाम खात्यावर झाला नाही. पुन्हा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ दिवसांपूर्वीही निवेदन दिले गेले होते. रस्त्यावरचे खड्डे न बुजवल्यास २२ मे रोजी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. बांधकाम अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाकडे फारसे लक्ष न दिल्याने सोमवारी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समितीने आगरदांडा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यास सुरुवात के ली होती.या वेळी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण समन्वय समिती अध्यक्ष राजेश कर्जेकर, सचिव रमेश कांबळे, मनोहर वासकर, रमेश पाटील, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या रास्ता रोको आंदोलनासाठी मुरु ड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश भोसले, उपनिरीक्षक संजय हेमांडे, पोलीस नाईक प्रवीण लोखंडे व १३ पोलीस कर्मचारी तैनात होते.