शहरं
Join us  
Trending Stories
1
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
2
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
3
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
4
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
5
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
6
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
7
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
8
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
9
IND vs SA : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! मोर्कोसह पहिल्या डावात द.आफ्रिकेनं साधला मोठा डाव
10
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
11
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
12
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
13
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
14
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
15
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
16
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
17
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
18
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
19
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
20
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आदिवासींची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:52 IST

नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. येथील खाणीच्या वाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने, झोळीतून पिंकी वाघमारे या आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिला रस्त्यातच झोळीत आपले प्राण गमवावे लागले.

कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. येथील खाणीच्या वाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने, झोळीतून पिंकी वाघमारे या आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिला रस्त्यातच झोळीत आपले प्राण गमवावे लागले. यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले असून, त्यांनी २६ जानेवारीपर्यंत रस्ता न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही ‘आदिवासींची वाट बिकट’ असल्याने येथील नागरिकांना रस्त्याअभावी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.पिंकी मूळची याच तालुक्यातील गैरकामथमधील होती. तीनच वर्षांपूर्वी तिचे खाणीची वाडी येथील मंगेश वाघमारे या तरु णाशी लग्न झाले होते. त्या दोघांचा सुखाने संसार सुरू असतानाच मागील आठवड्यात अचानक पिंकीची तब्बेत बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. वाडीपासून जवळच असलेले बीड आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने नाइलाजाने तिला पहाटे कर्जत उपजिल्हा रु ग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रस्ता नसल्याने झोळीतून नेताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, आता तरी विकासाच्या भूलथापा मारणाºया पुढाºयांना या वाडीकडील रस्ता करण्याची बुद्धी सुचेल का? असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला आहे.आदिवासी भागात विकास झपाट्याने होत आहे, असा डांगोरा नेहमीच पिटला जातो; परंतु आदिवासी भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहता, सरकारने आदिवासींची थट्टाच चालविली आहे. अनेक आदिवासीवाड्यांतील विद्यार्थी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी शहरी भागाकडे धाव घेतात. डोंगर-दºयातून मातीच्या रस्त्यांच्या पायवाटा शोधत ७-८ कि.मी.ची पायपीट करीत शिक्षण घेतात. हे हाल लोकप्रतिनिधींना दिसत नाहीत का? असा प्रश्नदेखील आदिवासींनी उपस्थित केला असून शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.>खाणीकडे जाणारी मृत्यूची बिकट वाटसभोवताली उंच उंचच डोंगर, घनदाट अरण्य, दाट झाडी, सहा ते सात फूट उंच गवत, ओढे -नाले, खाच-खळगे कसेबसे पार करत बीड गावावरून खाणीच्या वाडीकडे जावे लागते. उन्हाळ्यातील पायवाट पावसाळ्यातील उगवलेल्या जंगली झाडाझुडपांमध्ये कधीच दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे झाडाझुडपातून वाट काढत खाणीची वाडी गाठावी लागते. ही वाट काढताना गवतात लपलेले साप, विंचू कधी दंश करतील याचा नेम नाही. जंगल परिसर असल्याने जंगली श्वापदांच्या हल्ल्याची ही तेवढीच भीती असते. यामुळे जीव मुठीत धरूनच मार्गक्र मण करावे लागते.>रस्त्याअभावी आमच्या आदिवासीवाडीतील महिलेला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी. बीड ते खाणीची वाडी, तसेच स्टेशन-ठाकूरवाडीकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर करावा, रस्त्याअभावी मृत्यू होणे ही लाजिरवाणी बाब आहे, त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ २६ जानेवारीला आंदोलनात सहभागी होऊ.- अरुण वाघमारे, स्थानिक ग्रामस्थ>पावसाळ्यात तर ओढे-नाले दुथडी भरून वाहत असतात. त्यामुळे पायवाटेतील ओढे-नाले पार करताना वाहून जाण्याची भीती असते. शाळेतील लहान मुले, गर्भवती महिला यांची तर फारच तारांबळ उडते.- अशोक जंगले, आदिवासी सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा