शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देवनार कचराभूमीवर होणार वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:46 IST

कचऱ्यावर प्रक्रिया : कंत्राटात फेरफार केल्याचा स्थायी समितीत सदस्यांचा आरोप

मुंबई : देवनार कचराभूमीवर वीजनिर्मिती करण्याचे महापालिकेचे स्वप्न अखेर सात वर्षांनंतर पूर्ण होताना दिसत आहे. येथे दररोज ६०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र, या प्रस्तावात पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी यावेळी केला.

सन १९२७ मध्ये देवनार कचराभूमी सुरू करण्यात आली. १२ हेक्टर जागेवर ही कचराभूमी विस्तारलेली आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचºयापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प २०१३ पासून राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सुरुवातीला दररोज तीन हजार मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, निविदाकाराने प्रतिसाद दिला नसल्याने कचºयाची मर्यादा दररोज ६०० मेट्रिक टनांवर आणण्यात आली. मे. चेन्नई एम. एस. डब्ल्यू. प्रा. लि. आणि मे. सुएज एनव्हायर्नमेंट डंडिया प्रा. लि. कंत्राटदारांपैकी चेन्नई प्रा. लि. ठेकेदारांना अंतिम प्रक्रियेत (सी-पॅकेट) कामाची किंमतच भरली नसताना, त्याला तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी पुन्हा बोलावून १७३ कोटींनी कमी रकमेची आॅनलाइन नोंद करण्याची मुभा दिली. मर्जीतील ठेकेदाराला संधी देण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप करीत, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उपसूचना मांडून प्रक्रियेत पहिल्यांदा पात्र ठरलेल्या सुएज इंडिया प्रा.लि.ला काम देण्याची मागणी लावून धरली. यावेळी सर्वपक्षीयांनी शिवसेनेच्या उपसूचनेला पाठिंबा दिला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.प्रशासनाचे स्पष्टीकरण...च्या प्रक्रियेत संबंधित रक्कम भरण्याचे निर्देश तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी विधि विभागाच्या अधिकाºयाच्या तोंडी मंजुरीनंतरच दिल्याचे अतिरिक्त आयक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केली. मात्र, संबंधित ठेकेदाराला पालिकेने एके काळी काळ्या यादीत टाकल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. पहिल्यांना रीतसर टेंडर प्रक्रियेनुसार रक्कम नोंद केलेल्या सुएज इंडिया प्रा. लि.ला काम द्यावे, अशी मागणी सर्व पक्षीयांनी लावून धरली. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचे काम मे. सुएज एनव्हायर्नमेंटला देण्याचा प्रस्ताव उपसूचनेच्या धर्तीवर मंजूर केल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :Raigadरायगड