शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

१०५ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र स्वतंत्र झाला - आंबेतकर

By admin | Updated: May 2, 2017 03:02 IST

स्वतंत्र सैनिक पुष्पलता आंबेतकर यांनीदेखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाशझोत टाकताना महाराष्ट्राला

तळा : स्वतंत्र सैनिक पुष्पलता आंबेतकर यांनीदेखील संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाशझोत टाकताना महाराष्ट्राला १०५ हुतात्मा गमवावे लागले. तेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला. त्या हुतात्म्यांचे आज आपण स्मरण केले पाहिजे. त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे, असे विचार व्यक्त केले.तहसील कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. दलितमित्र नारायण मेकडे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास सांगताना, तळ्याचे सुपुत्र माजी अर्थमंत्री डॉ. सी. डी. देशमुख यांनी या मुद्द्यावर अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा घराघरांत पोहोचला आणि हे आंदोलन उग्र झाले. म्हणूनच मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झाला, असे सांगितले.तळे येथून नारायण मेकडे, तुकाराम पेलतेकर, माधवराव शिर्के, पुष्पलता आंबेतर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला होता. शहरात विविध ठिकाणी महराष्ट्र दिन मोठ्या उत्साही वातारणात साजरा करण्यात आला. यावेळी तळे शहरात एस. एस. निकम इंग्लिश स्कूल येथे सदस्य चंद्रकांत रोडे, गो. म. वेदक विद्यामंदिर येथे अध्यक्ष अ‍ॅड. विद्याधर धामणकर, जी. एम. वेदक कॉलेज आॅफ सायन्स आणि जी. एम. वेदक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य पी. जी. मुळे, प्रा. आरोग्य केंद्र येथे डॉ. बिरवाटर, तळा नगरपंचायत येथे नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, तळा पं. समिती येथे सभापती रवींद्र नटे तसेच शासकीय ध्वजवंदन तहसील कार्यालयात तहसीलदार भगवान सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस विभागातर्फे पो. नि. जाधव यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.याप्रसंगी नगराध्यक्ष रेश्मा मुंढे, सभापती रवींद्र नटे, उपसभापती गणेश वाघमारे, पं. स. सदस्य देविका लासे, कदम, नगरसेवक चंद्रकांत रोडे, राजश्री पिंपळे, गटविकास अधिकारी एन. आर. परदेशी आदींसह शासकीय कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) तळा शहरात एस. एस. निकम इंग्लिश स्कूल येथे सदस्य चंद्रकांत रोडे, गो. म. वेदक विद्यामंदिर येथे अध्यक्ष अ‍ॅड. विद्याधर धामणकर, जी. एम. वेदक कॉलेज आॅफ सायन्स आणि जी. एम. वेदक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य पी. जी. मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जनता विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरारसायनी : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन जनता विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोहोपाडा येथे सोमवारी साजरा करण्यात आला. ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष व कामगारनेते राम मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्र मास मराठी व इंग्रजी माध्यमांचे प्राचार्य डी. सी. सुपेकर व बी. एस. वारे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रुती घरत व दोन्ही माध्यमांचा शिक्षक वृंद, नागरिक उपस्थित होते.धाटाव ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणधाटाव : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ५७ वर्षे पूर्ण झाल्याने रोह्यात धाटाव ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच उत्तम मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विनोद पाशिलकर, माजी सरपंच यशवंत जाधव, माजी उपसरपंच सुदाम रटाटे, रोहिदास पाशिलकर, सदस्य हरी खैरे आदींसह ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामसभा घेण्यात आली.