शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा पेपर देऊन ‘ती’ चढली बोहल्यावर! आदिवासी पाड्यातील तरुणीची जिद्द

By राजेश भोस्तेकर | Updated: April 14, 2023 06:12 IST

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आदिवासी  समाजातील  एका तरुणीने आगळा आदर्श कृतीतून घालून दिला आहे.  

अलिबाग :  

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आदिवासी  समाजातील  एका तरुणीने आगळा आदर्श कृतीतून घालून दिला आहे.  घरातल्या मंडळींचा आग्रह डावलून पदवीची परीक्षा देईपर्यंत विवाह न करण्याचा  निश्चय पूर्ण करून दाखविला.  गुरुवारी दुपारी  टीवायबीकॉमचा अखेरचा पेपर संपला आणि २ वाजता ती बोहल्यावर चढली.

अलिबागच्या मैनुशेट वाड्याजवळ श्रीगाण या आदिवासी पाड्यावरील जेएसएम कॉलेजची विद्यार्थिनी प्रगती संतोष नाईक हिचा विवाह झाला.  परिसरात पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारी ती पहिलीच आहे. संतोष नाईक हे मोलमजुरी करतात.  प्रगतीच्या शिक्षणासाठी सुहास म्हात्रे व अनुजा म्हात्रे यांनी सहकार्य केले . 

प्रगतीला पुढचे शिक्षण घेण्यास आपली आडकाठी नसेल, असे प्रगतीच्या पतीने म्हटले आहे.  परिक्षेपूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, ॲड. गौतम पाटील व उपाध्यक्षा, डॉ. साक्षी पाटील  आदींनी तिला आशीर्वाद दिला.

आदिवासी समाजातील एक मुलगी आमच्या महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून स्वत:ची प्रगती करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी व वैवाहिक आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो.    - ॲड. गौतम पाटील,अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ, अलिबाग