शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाल्मर लॉरी व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2023 19:39 IST

व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

मधुकर ठाकूर, उरण : भेंडखळ येथील बाल्मर लॉरीतील कामगारांच्या धरणे आंदोलनानंतर आणि कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने ताळ्यावर आलेल्या कंपनी व्यवस्थापनाने १५ पैकी १२ कामगारांना याआधी देण्यात येत असलेल्या वेतनावर कामावर घेण्याची तयारी दर्शवली आहे.व्यवस्थापनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

भेंडखळ येथील बाल्मर लॉरी कंपनीत कंत्राटी पद्धतीवर काम करत असलेल्या १५ ऑपरेटर कामगारांना नव्याने आलेल्या ठेकेदारांनी याआधी देण्यात येत असलेले वेतन देण्यास नकार दर्शविला होता.त्यानंतर कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर १५ पैकी ७ कामगारांनाच जुन्या वेतनाप्रमाणे वेतन देण्याची तयारी दर्शवली होती.मात्र व्यवस्थापनाच्या निर्णयाशी कामगार सहमत नव्हते. तसेच व्यवस्थापनही कामगारांना याआधी प्रमाणे वेतन देण्यास तयार नव्हते.यामुळे दोघांत संघर्ष निर्माण झाला होता.

या संघर्षानंतर कामगारांनी न्याय हक्कासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती.कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर वठणीवर आलेल्या व्यवस्थापनाने मंगळवारी (२६) चर्चा केली.अखेर महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने १५ पैकी १२ कामगारांनाच जुन्या वेतनाप्रमाणे वेतन देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली आहे . तसेच उर्वरित ३ कामगारांचा निर्णयचर्चा करून मार्ग काढू असे चर्चेअंती ठरले आहे. त्यामुळे कामगारांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात असल्याची माहिती कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण