शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कर्जतमधील पाण्याच्या टाक्यांची १२ वर्षांनंतर स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 01:40 IST

शहराला आता साठवण टाकीतून स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळू लागले आहे.

- विजय मांडेकर्जत : कर्जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या नळपाणी योजना अस्तिवात आल्यापासून स्वच्छ करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याबाबत विषयावर त्याचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर सर्व टाक्या स्वच्छ केल्या जात आहेत. साधारण सहा इंच मातीचा थर प्रत्येक टाकीमध्ये आढळून आल्याने आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागदेखील टाक्यांची स्वच्छता केल्याने काहीसा आनंददायी झाला आहे. शहराला आता साठवण टाकीतून स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळू लागले आहे. १२-१३ वर्षांनंतर या टाक्या स्वच्छ करण्यात आल्याने नागरिकदेखील शुद्ध पाण्याचा वापर करता येत असल्याने आनंदी आहेत.कर्जत शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १९९८ मध्ये वाढीव नळपाणी योजना तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने मंजूर केली होती. या नळपाणी योजनेतून शहरातील सर्व भागांना पाणी पुरवठा केला जात असून आकुर्ले, गुंडगे, भिसेगाव, विश्वनगर आणि टेकडी आदी ठिकाणी साठवण टाक्या आहेत. त्या साठवण टाक्यांमध्ये पाणी आल्यानंतर ते पुढे वितरित केले जाते. दहिवली समर्थनगर भागात असलेल्या जल शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात आलेले पाणी पुढे साठवण टाकीत पोहोचते. त्या सर्व टाक्यांमधून पाणी शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. त्या वेळी सर्व नागरिक हे शुद्ध पाणी मिळते म्हणून खूश असायचे; परंतु साठवण टाक्यांची अनेक वर्षे स्वच्छता केली जात नसल्याने १९ वर्षांच्या पावसाळ्यात गोळा होणारा गढूळ पाण्याचा गाळ साठवण टाकीत दर वेळी साठून राहायचा. पावसाळ्यात तर नळाद्वारे येणाºया गढूळ पाण्याने नागरिक हैराण होत होते. साथीचे आजारदेखील दरवर्षी कर्जत शहरातील काही भागात दूषित पाण्यामुळे परसत होते.ही नेहमीची समस्या लक्षात घेऊन कर्जत शहरात साथीच्या आजारांवर अभ्यास करणाºया सुवर्णा केतन जोशी या कर्जत शहराच्या प्रथम नागरिक म्हणजे नगराध्यक्ष झाल्या. त्यांनी पाणीपुरवठा योजनेचे पाणीगळतीचे प्रमाण रोखण्यासाठी गेले वर्षभर नियोजनपूर्वक केलेले प्रयत्न यामुळे शहरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही समस्या दूर झाली. त्यांनी पालिका सभागृहाला विश्वासात घेऊन शहरातील नागरिकांना २४ तास पाणी दिले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी कर्जत शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या या स्वच्छ करण्याचा विषय सभागृहात ठेवला. वेगवेगळ्या सहा ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा ठेका देण्यात आला होता. मात्र, मागील काही महिन्यांत असलेल्या निवडणुका यामुळे तो विषय मागे पडला होता.चार टाक्यांमधील गाळ काढलाशहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची पाणीकपात न करता पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. आतापर्यंत चार पाणी साठवण टाक्यांतील गाळ काढून त्या स्वच्छ केल्या गेल्या आहेत. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, पाणी पुरवठा सभापती संचिता संतोष पाटील आणि पालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे, पाणी पुरवठा अभियंता अशोक भालेराव यांनी साठवण टाक्यांची स्वच्छतेचे काम होताना त्या ठिकाणी पाहणी सुरू ठेवली आहे.सकाळच्या सत्रात पाणी देऊन झाल्यावर एका दिवशी एक याप्रमाणे गुंडगे, विश्वनगर, आकुर्ले येतील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या आणि त्या टाकीतून विनाअडथळा दुसºया दिवशी सकाळी पाणी सोडले गेले आहे. टाक्यांमध्ये साठलेला साधारण ६ इंच पर्यंत पोहोचलेला गाळ टाकीतील पाणी पंप लावून बाहेर काढण्यात आले. तीन टाक्या केवळ एक दिवसात तर कचेरी येथील मोठी टाकी दोन दिवसांत स्वच्छ केली गेली आहे. आता भिसेगाव येथील आणि कॉलेज रोड येथील पाण्याचीटाकी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.आम्ही शहराला शुद्ध पाणी देतो, मग आरोग्याचे प्रश्न का निर्माण होतात हे सतत सतावत होते. टाक्यांमध्ये पाच ते सहा इंच मातीचा थर निर्माण झाल्याचे लक्षात आल्याने तत्काळ पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षदेखील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या पाहिजेत, यासाठी आग्रही होत्या.- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जतकर्जत शहरात साथीचे आजार प्रामुख्याने पावसाळ्यात बळावत होते, ते दूषित पाण्यामुळे होत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे आम्ही पाणी शुद्ध करून देऊन अडचण का निर्माण होते याचा शोध घेतला. त्या वेळी पाण्याच्या टाक्या योजना तयार केल्यापासून एकदाही स्वच्छ केल्या नव्हत्या. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करून सर्व पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जात आहेत.- सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष, कर्जतशहरातील नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहोत. पालिका नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांचे शहरातील नागरिकांना २४ तास पाणी देण्याचे स्वप्न आहे, त्यासाठी आमच्या पाणीपुरवठा विभागाचे नियोजन सुरू आहे.- संचिता पाटील, सभापती,पाणी पुरवठानागरिकांना दरवर्षी दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागायचे, त्यात पावसाळ्यात गढूळ पाणी ही समस्या होतीच. सापही नळाद्वारे आले आहेत. त्यामुळे शुद्ध पाणी मिळावे यासाठी केले जात असलेले नियोजन शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.- दिलीप आंबवणे, नागरिक, डेक्कन जिमखानाआम्ही शहरातील सर्व सहा पाण्याच्या साठवण टाक्या स्वच्छ करण्याची निविदा काढली. ठेकेदाराकडून कामे करून घेताना पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्या कामावर लक्ष ठेवून होते. मात्र, प्रत्येक टाकीची स्वच्छता होत असताना सर्व पदाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी पाहणी करून टाक्या स्वच्छ होतात काय ते पाहिले.- अशोक भालेराव, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, कर्जत नगरपालिका

टॅग्स :Karjatकर्जत