लोकमत न्यूज नेटवर्कमुरु ड जंजिरा : मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेली, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कोकणाला मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी कोकणातील माणूस या योजनांचा पुरेसा लाभ घेत नाही, अशी खंत आमदार सुभाष पाटील यांनी व्यक्त केली.मुरु ड व अलिबाग तालुका कृषीविभाग व पंचायत समिती यांचे संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०१७ नियोजन सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कृषी अधिकाऱ्यांनी सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले.मुरु ड तालुक्यातील मिठागर,खामदे येथील पाणीटंचाईच्या संदर्भात तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. भारत निर्माण योजनेतून ३ वर्षांत १०० कोटींची मागणी असताना जिल्हानियोजन मंडळाने केवळ १० कोटी निधी मिळाल्यामुळे पाणीपुरवठा योजना रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. योजनेंतर्गत पुरवणी निधीला शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागाने गांभीर्याने शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब शेतकऱ्यांना देण्याचे संकेत दिले. या प्रसंगी व्यासपीठावर आम. सुभाष पाटील, रायगड जि.प. उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, मुरुड तालुका शेकाप चिटणीस मनोज भगत, जि.प. सदस्या नम्रता कासार, मुरुडतालुुका पं.स.उपसभापती प्रणिता पाटील, मोतीराम पाटील, विजय गिदी, मुरु ड गटविकास अधिकारी एस.यू. चव्हाण, अलिबाग गटविकास अधिकारी संदीप प्रधान,तालुकाकृषीअधिकारीबी.आर. जानुगडे, तालुका कृषीअधिकारी श्याम धर्माधिकारी,बाबू नागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक करताना कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी व बी.आर.जुनागडे यांनी अनुक्र मे मुरु ड व अलिबाग तालुक्याची भौगोलिक क्षेत्राची माहिती, लागवड क्षेत्र, सरासरी पर्जन्य आदीचा आढावा घेत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान खरीप २०१७ चा संकल्प पूर्तीसाठी पीक प्रात्याक्षिके, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, शेतकरी प्रशिक्षण व सहली, भात बियाणे, तसेच रासायनिक खतांची मागणी आदींचे लक्षांक स्पष्ट केले. सभेस रायगड जिल्हापरिषद उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांनी लागवड क्षेत्र वाढीस लागण्यासाठी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना शोधून शेती लागवडीसाठी प्रवृत्त केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २०२०चे स्वप्न पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष वेधले. नियोजन सभा वर्षातून किमान दोन व्हाव्यात, अशा सूचना आधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.यू.चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन सुनील प्रधान यांनी केले.तळ्यात जनजागृतीतळा तालुक्यात ‘‘उन्नत शेती - समृध्द शेतकरी अभियान अंतर्गत १५ मे पर्यंत कृषी जनजागृती पंधरवडाचे आयोजन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतील समाविष्ठ गावांत करण्यात आले आहे. कृषि जनजागृती पंधरवडा दरम्यान कृषि विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी प्रत्येक गावात सभेचे आयोजन करुन शेतकऱ्यांना भात किंवा प्रक्रिया प्रात्याशिक, भात उगवण क्षमता प्रात्याक्षिक आदींवर मार्गदर्शन करण्यात आले.
मुरुड येथे ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान
By admin | Updated: May 8, 2017 06:19 IST