शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मेहनत घेतल्यास पदवीधर मतदार संघात विजय निश्चित - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 06:48 IST

राज्यात शिवसेनेची एक हाती सत्ता आणणे, हेच आपले उद्दिष्ट आहे. केवळ विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक जिंकून हे लक्ष्य साध्य करता येणार नाही.

बिरवाडी/महाड : राज्यात शिवसेनेची एक हाती सत्ता आणणे, हेच आपले उद्दिष्ट आहे. केवळ विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक जिंकून हे लक्ष्य साध्य करता येणार नाही. त्यासाठी विधान परिषदेमध्येही संख्याबळ असणे आवश्यक आहे, त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात विजय संपादन करायचाच, या निर्धाराने प्रत्येक शिवसैनिकाने विधान परिषद उमेदवारांचा नियोजनबद्ध प्रचार सुरू करण्याचे आवाहन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महाड येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले.कोकण पदवीधर मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला केंद्रीय मंत्री अनंत गीते, खा. अनिल देसाई, आ. भरत गोगावले, सदानंद थरवळ, कोकण पदवीधर मतदार संघातील उमेदवार संजय मोरे, अ‍ॅड. राजीव साबळे, उपजिल्हाप्रमुख बिपीन म्हामुणकर, जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.या निवडणुकीत शिवसेना १०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी या वेळेस व्यक्त केला. एकूण पदवीधर मतदारांपैकी ५० टक्के मतदारनोंदणी शिवसेनेने केली आहे. मात्र, कुठेही गाफील न राहता, प्रत्येक शिवसैनिकाने किमान २० मतदारांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी या वेळेस व्यक्त केली. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील चारही जागा शिवसेना जिंकेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.कोकण पदवीधर मतदार संघातील उमेदवार संजय मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण सभापती म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती या वेळी दिली. या विधान परिषदेत निवडणुकीत शिवसैनिक आणि युवा सैनिक हेच आपल्या प्रचाराचे प्रभावी माध्यम असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना