शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेत लुटमार करणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 02:33 IST

कोकण रेल्वे मार्गावर लूट करणारी टोळी सक्रिय झाली आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून मध्यरात्री प्रवासी झोपल्यावर रेल्वेची चेन खेचून गाडी थांबविली जाते आणि प्रवाशांच्या मौल्यवान सामानाची

रोहा : कोकण रेल्वे मार्गावर लूट करणारी टोळी सक्रिय झाली आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून मध्यरात्री प्रवासी झोपल्यावर रेल्वेची चेन खेचून गाडी थांबविली जाते आणि प्रवाशांच्या मौल्यवान सामानाची लूट केली जाते. या अनोळखी टोळीने दोन स्वतंत्र रेल्वेत प्रवास करणाऱ्या मुंबईतील चार कुटुंबीयांना लुटले आहे. हा प्रकार गुरु वारी मध्यरात्री घडला असून रोहा पोलीस ठाण्यात प्रवाशांनी तक्र ार दाखल केली आहे. मागील दोन महिन्यांपासून कोकण रेल्वेत लुटमारी, चोरीचे प्रकार वाढत असल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाबू पनिचरी (५९, रा. मुकुंदनगर, मुंबई) व त्यांची पत्नी बिना (५५) कुटुंबीयांसमवेत कोचीवली - कुर्ला एक्स्प्रेसने केरळहून मुंबईकडे जात असताना रात्री १२.३० च्या दरम्यान गाडी रोहा रेल्वे स्टेशनजवळ क्रॉसिंगसाठी थांबली. यावेळी चोरट्यांनी पनिचरी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून नेली. तत्पूर्वी याच गाडीत वावरणाऱ्या चोरट्यांनी दुसऱ्या एका महिलेजवळील ३ हजार रोख व १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली. दुसरी घटना मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये घडली. कणकवलीहून मुंबईसाठी येत असलेल्या पेडणेकर दाम्पत्याच्या साहित्याची चोरी झाली. हा प्रकार समजताच कोणीतरी चेन ओढली. रेल्वे काहीवेळाने थांबणार म्हणून या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले तर दुसऱ्या डब्यातील प्रवाशाजवळील मोबाइल व ८ हजार रोख रक्कम असे एकूण १६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले.