शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सुनील तटकरे, अनंत गीते यांच्या विरोधातील गट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 02:36 IST

रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते या तुल्यबळ नेत्यांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते या तुल्यबळ नेत्यांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही उमेदवारांनी निवडून येण्यासाठी तयारीही सुरू केली आहे. त्याच वेळी दोन्ही उमेदवारांच्या विरोधातील नाराजांचे विविध गट सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करताना दोन्ही नेत्यांचे राजकीय कसब पणाला लागणार आहेत.तटकरे यांना शेकाप आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तटकरे यांच्या मनातील विश्वास दृढ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप यांच्या मतांमुळे विरोधी उमेदवारांवर चांगलाच परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. तटकरेंविरोधात नाराज असलेल्या गटांकडे त्यांच्या राजकीय क्षमतेनुसार व्होट बँक आहे. विरोधकांनी प्रत्येक गाव आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून तटकरे यांच्या विरोधात मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे शेकापला आघाडीत स्थान दिल्याने अलिबाग तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तितकेसे रुचलेले नाही. त्यामुळे यातील काही नाराज हे तटकरेंच्या विरोधात मोर्चा खोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची प्रचिती काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठकीत काही प्रमाणात दिसून आली होती.शेकापचे अलिबागच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वर्चस्वाचा फायदा तटकरे यांना होणार असला, तरी येथील नाराजी आताच्या अटीतटीच्या लढाईत निश्चितच परवडणारी नाही.तटकरे यांच्याविरोधात काही प्रमाणात नाराजीचा सूर असतानाच गीते यांच्यावरही त्यांच्याच पक्षातील काही कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जाते. विकासकामांमध्ये वाटा न मिळणे, पदाधिकारी नियुक्तीमध्ये डावलले जाणे, मतदार संघातील कामे वेळेवर न होणे, शिवसेना नेते नव्याने आलेल्यांना मानसन्मान देताना जुन्यांकडे दुर्लक्ष करणे, अशा काही कारणांनी गीते यांच्याविरोधात नाराजीचा सूर असल्याचे दिसून येते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना नाराजांचे व्यवस्थापन करताना काळजी घ्यावी लागणार आहे.दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर अशा नाराजांची संख्या वाढतच असते. त्यामुळे त्यांना किती गंभीरपणे घ्यायचे आणि नाही, हे समजण्याइतपत तटकरे आणि गीते हे सुज्ञ आहेत.

टॅग्स :Raigadरायगड