शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

३१ डिसेंबरची कारवाई; मद्यपींकडून दोन लाखांवर दंड वसुली

By निखिल म्हात्रे | Updated: January 1, 2024 20:42 IST

जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे.

अलिबाग : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ९० चालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यातील प्रत्येक नाक्यावर वाहतूक शाखेने वाहनचालकांची तपासणी करीत सुमारे २ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षी ४० जणांवर कारवाई करीत साधारण ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला. जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे.

रायगडात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी मद्य प्राशन करुन मोटार चालविणाऱ्या वाहकांना चाप बसण्यासाठी आता नाक्यानाक्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावीत ब्रेथ अॅनिलायझर लावून ग्राहकानं किती दारू सेवन केलीय याचा शोध घेत मागील  साधारणत: 90 मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

तुम्ही किती दारू प्यायलात हे तपासण्यासाठी अल्को बुथमध्ये असणाऱ्या यंत्रणाला फक्त १० सेकंद लागतात. त्यामुळे तुम्ही गाडी चालवण्यायोग्य स्थितीत आहात का याचही माहिती याच बुथमध्ये लगेच दाखवली जाते. तसेच रक्तात ३० मिलीग्रॅम ते १०० मिलीग्रॅमपर्यंत अल्कोहोल आढळलं आणि तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. असेच दारु प्राशन करीत मोटरसायकल चालविणाऱ्या 90 जणांकडून मागील तिन महीन्यात सुमारे  2 लाख 15 हाजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर मागील वर्षी 40 जणांवर कारवाई करीत साधारणता 80 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत डंक अँण्ड ड्रायुव्ह ची मोहीम हाती घेतली आहे. 

अनेक वाहन चालक हे बेशिस्तपणे तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवत असतात. तर काही वाहन चालक हे दारु पिऊन वाहन चालवत असतात. अशा वाहन चालकांमुळे अपघात होऊन त्यात निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे वाहन चालकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये असे अवाहन नारीकांना केले होते, त्याला उत्फुर्त प्रतिसाद नागरीकांकडून मिळाला होता. मात्र काही ठिकाणी नागरीकांनी मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार घडले तेथे वाहतुक पोलिसांकडुन अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या मोहीमेमुळे मद्य प्राशन करुन मोटारसायकल चालविणा-या मद्यपींना चाप बसला असल्याचे सोमनाथ घार्गे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग