शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By admin | Updated: June 3, 2016 02:00 IST

गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सा. रा. साळुंखे, औषध निरीक्षक वि.ब. तासखेडकर व को.गो. गादेवार यांच्या पथकाने पंचासमवेत

रोहा : गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सा. रा. साळुंखे, औषध निरीक्षक वि.ब. तासखेडकर व को.गो. गादेवार यांच्या पथकाने पंचासमवेत रोहे दमखाडी येथील डॉ. देवेंद्र पांडुरंग जाधव, एम.एस. (आॅपथॅलमॉलजिस्ट) यांच्या सुमन नेत्रालय या रूग्णालयाची चौकशी केली असता डॉ. देवेंद्र पांडुरंग जाधव यांनी रूग्णालयाच्या आवारातील एका गाळ्यामध्ये विनापरवाना औषधाचे दुकान सुरू केल्याचे आढळून आले. या दुकानातून ४ लाख ३० हजार रूपये किमतीची विविध औषधे, इतर कागदपत्रे असा मुद्देमाल जप्त केला.डॉ. देवेंद्र पांडुरंग जाधव यांनी रूग्णालयाच्या आवारात सुरू केलेल्या विनापरवाना औषध दुकानातून त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत रूग्णालयात येणाऱ्या ग्राहकांना, परिसरातील इतर डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून व विनाचिठ्ठीही औषधांची विक्र ी करीत होते असे दिसून आले. चौकशीच्या सुरूवातीस औषधांची बेकायदा विक्र ी सिध्द करण्यासाठी एका पंचास औषध खरेदीसाठी एका चिठ्ठीवर औषधांची नावे लिहून पाठविण्यात आले. त्या पंचास उपरोक्त दुकानातील हजर रूग्णालयाच्या एका महिला कर्मचाऱ्याने औषध विक्र ी केली. बिल मागणी करता सचिन मेडिकल स्टोअर्स, घर क्र . ६७९, दमखाडी-रोहा, जि. रायगड या नावाचे बिल देण्यात आले. अधिक चौकशी करता यापूर्वी उपरोक्त जागी एका रजिस्टर्ड फार्मासिस्टला किरकोळ औषध विक्र ीसाठी परवाने मंजूर होते. हे परवाने त्यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये रद्द करण्यासाठी प्रशासनास सादर केले होते. हे परवाने प्रशासनाने रद्द केल्यानंतर दुकानाचा ताबा डॉक्टरांकडे देण्यात आला होता. उपरोक्त डॉक्टराने या ठिकाणी औषधाचे दुकान विनापरवाना सुरू केल्याचे दिसून आले. ही बाब औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या कलमाचे उल्लंघन करणारी आहे. तपासणी वेळी सुमारे ४ लाख ३० हजार रूपये किमतीची औषधे, औषधांची खरेदी बिले, विक्री बिले व इतर अभिलेख वि.ब. तासखेडकर औषध निरीक्षक, रायगड-पेण यांनी जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची कस्टडी अलिबाग न्यायालयात अर्ज दाखल करून प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मधील कलमान्वये डॉक्टरांच्या विरूध्द न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त सा.रा. साळुंखे यांनी दिली. (वार्ताहर)