शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
4
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
7
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
8
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
9
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
10
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
11
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
12
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
13
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
14
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
15
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
16
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
17
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
18
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
19
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
20
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!

बारा खारभूमी योजनांवर कार्यवाही सुरू; राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 04:50 IST

अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते माणकुले या पट्ट्यातील खारभूमी योजना, आंबा खोरे सिंचन प्रकल्पातील लाभधारकांना पाण्याचा हक्क, तसेच काळकुंभे प्रकल्प या तीन विषयांवर आढावा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते माणकुले या पट्ट्यातील खारभूमी योजना, आंबा खोरे सिंचन प्रकल्पातील लाभधारकांना पाण्याचा हक्क, तसेच काळकुंभे प्रकल्प या तीन विषयांवर आढावा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार ठाणे येथील खारभूमी विकास मंडळाचे प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता यांनी नुकतीच सिंचन भवनात श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत तातडीची आढावा बैठक घेण्यात आली.त्यानुसार अलिबाग तालुक्यांतील १२ खारभूमी योजनांच्या बांधबंदिस्ती व दुरस्तीच्या कामावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच काही खारभूमी योजनांचा समावेश राष्टÑीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात करण्यात आला आहे. या कामांकरिता लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली.अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते माणकुले या खाडीकिनारच्या पट्ट्यात एकूण १२ खारभूमी योजना आहेत. यापैकी १५६ हेक्टर क्षेत्राची फणसापूर-कुर्डुस खारभूमी योजना १९५५-५६मध्ये बांधण्यात आली, तर ३३४ हेक्टर क्षेत्राची काचळी-पिटकरी खारभूमी योजना १९५६-५७मध्ये बांधण्यात आली. मात्र, त्यावर दुरुस्ती वा डागडुगीची कामे करण्यात आलेली नाही.समुद्र संरक्षक बंधाºयास उधाणाच्या लाटांनी मोठी भगदाडे पडली होती. परिणामी, खारेपाणी भातशेतीत घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता दोन्ही योजनांची कामे ‘राष्टÑीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात’ समाविष्ट करण्यात आली आहेत.प्रकल्पात समाविष्ट योजनांचा पर्यावरण व सामाजिक परिणाम अहवाल नुकताच पूर्ण झाला असून, त्यानुसार सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुधारित प्रकल्प अहवालाला नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट आॅथोरिटीकडून (एन.डी.एम.ए.) मान्यता मिळाल्यानंतर या कामासाठी निविदा काढण्यात येतील.काचळी-पीटकरी योजनेची १३.६२ कोटी रुपये, तर फणसापूर-कुर्डुस योजनेची रु. ११.४९ कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत अपेक्षित असल्याचे बैठकीत सांगण्यात आल्याचे भगत यांनी सांगितले.कोपरी-चिखली खारभूमी योजना (५२ हेक्टर क्षेत्र) १९५५-५६ मध्ये करण्यात आली. विस्तार व सुधारण या लेखाशीर्षांतर्गत या योजनेच्या संरक्षक बांधाच्या पुन:स्थापनेचे व उघडी दरवाजे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच योजनेच्या संपूर्ण नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.मेढेखार खारभूमी योजना (१७६ हेक्टर क्षेत्र) १९५३-५४ बांधण्यात आली होती.देहेनकोनी खारभूमी (१६९ हेक्टर क्षेत्र) योजना १९५५-५६ मध्ये बांधण्यात आली होती. मात्र, या दोन्ही योजना कांदळवनांमुळे बाधित झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.शहाबाज खारभूमी योजना ९.३९ कोटींचे अंदाजपत्रक१शहाबाज खारभूमी (४९८ हेक्टर क्षेत्र) योजना १९६६-६७मध्ये बांधण्यात आली. पहिल्या टप्प्यात बांधाच्या पुन:स्थापनेचे काम व उघडी दरवाजे बसविणेचे काम पूर्ण केले आहे. तर योजनेच्या नूतनीकरणाचे ९.३९ कोटींचे अंदाजपत्रक नोव्हेंबर २०१७मध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी प्रदेश कार्यालयास पाठविण्यात आले आहे. मंजुरी प्राप्त होताच या कामास प्रारंभ होईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. कमळपाडा खारभूमी (३५० हेक्टर क्षेत्र) योजना १९६७-६८मध्ये बांधण्यात आली. २००५-०६ मध्ये विस्तार व सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत धामणपाडा बांधाच्या पुन:स्थापनेचे काम व उघडी दरवाजे बसविण्याचे काम पूर्ण करून नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.धाकटापाडा-शहापूर योजनेचे४.१४ कोटींचे अंदाजपत्रक२धाकटापाडा-शहापूर खारभूमी (३४५ हेक्टर क्षेत्र) योजना १९५४-५५ मध्ये बांधण्यात आली. विस्तार व सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत बांधाच्या पुन:स्थापनेचे काम व उघडी दरवाजे बसविणेचे काम पूर्ण केले आहे. योजनेचे ४.१४ कोटींचे संपूर्ण नूतनीकरणाचे अंदाजपत्रक आहे. नोव्हेंबर-२०१७मध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी प्रदेश कार्यालयास पाठविण्यात आले आहे. मोठापाडा शहापूर खारभूमी (४७४ हेक्टर क्षेत्र) योजना शासनाच्या ताब्यात नाहीत. ही खासगी योजना शासनाच्या ताब्यात घेण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी जून २०१६मध्ये सादर केला आहे. याबाबतची कार्यवाही प्रतीक्षेत आहे.धेरंड खारभूमी योजना ४.१४ कोटींचे नूतनीकरण अंदाजपत्रक३धेरंड खारभूमी (१४९ हेक्टर क्षेत्र) योजना १९५५-५६मध्ये बांधण्यात आली. विस्तार व सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत बांधाच्या पुन:स्थापनेचे काम व उघडी दरवाजे बसविण्याचे काम पूर्ण केले आहे. या योजनेचे ४.१४ कोटी रुपये रकमेचे संपूर्ण नूतनीकरणाचे अंदाजपत्रक नोव्हेंबर-२०१७ मध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी प्रदेश कार्यालयास सादर करण्यात आले आहे.मानकुळे, सोनकोठा खारभूमी योजनेसाठी १०.७९ कोटींचे अंदाजपत्रक४मानकु ले खारभूमी (५३२ हेक्टर क्षेत्र) योजना १९५६-५७मध्ये, तर सोनकोठा (२६५ हेक्टर क्षेत्र) योजना १९५५-५६मध्ये बांधण्यात आली. योजनांच्या लगत असलेल्या सोनकोठा, हाशिवरे व मानकुळे या शासकीय योजनांच्या बांधांना १९९३मध्ये मोठे भगदाड पडले होते. १९९३ ते १९९५ या कालावधीत हे भगदाड बुजवण्यासाठी तीन वेळा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भगदाड मोठे असल्याने डागडुजी कमकुवत ठरली.

टॅग्स :Raigadरायगड