बिरवाडी : महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रिव्ही कंपनीत ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या ९२ कामगारांना पुन्हा कामावर घेतले नाही तर मारून टाकीन अशी धमकी दिल्याप्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्याविरोधात सीईटीपी चेअरमन संभाजी पठारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.संभाजी पठारे (५०, रा. केएसएफ कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी दुपारी त्यांच्या मोबाइलवर सुरेश कालगुडे यांनी फोन करून जीवे मारेन अशी धमकी दिली आहे. या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा म्हणून केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत जिल्हा परिषदेचे स्थानिक सदस्य तथा विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे म्हणाले की, मी फोन केला होता मात्र कोणालाही जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली नाही, असे स्पष्ट केले. (वार्ताहर)
धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: October 9, 2015 23:45 IST