शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पडम जवळ एसटीला अपघात, महिला गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 01:00 IST

अनेकांनी केले मदतकार्य : महिला गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

रोहा : महाड-वडपाले येथे एसटीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रोहा-बोरीवली एसटीला अपघात झाला. पडम गावाजवळ रस्त्याच्या कडेला एसटी पलटी झाल्याने काही प्रवासी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरूप असून तीन जखमींना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सकाळी या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी मदातकार्य केले.

एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून पलटी झाल्याचे सांगण्यात आले. गाडीत साधारण २० प्रवासी होते. त्यातील तीन प्रवासी जखमी झाले. गाडी पलटी होताच भीतीने चालक पळून गेला. एसटी दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे रोहा तालुका कामगार संघटक अ‍ॅड. हर्षद साळवी, मनोज लांजेकर, योगेश दाखवे, नगरसेवक जुबेर चोगले व ग्रामस्थ मदतीसाठी तत्काळ धावून गेले. जखमींना आणण्यासाठी तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठविली. दुर्घटनेची माहिती देण्यासाठी मदतकार्य करणाऱ्यांनी संपर्क केला असता डेपो कार्यालयात फोन लागले नाहीत. तर आगारप्रमुखांनी फोन घेतले नाहीत. अखेर रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी एसटी दुर्घटनेची दखल घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या. रोहा पोलीस निरीक्षक राजेंद्र परदेशी यांनी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. या दुर्घटनेत एक प्रवासी महिला गंभीर जखमी झाली आहे.च्सुरक्षित प्रवासाची हमी देणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला अपघात होत आहेत. भंगारावस्था तितक्याच धोकादायक गाड्या प्रवाशांच्या दिमतीला आहेत. त्या बसेस खड्डेमय रस्त्यावरून चालविण्याची कसरत चालकांना करावी लागते. तासन्तास खराब रस्त्यावरून गाड्या चालवाव्या लागतात. चालकांना विश्रांती मिळत नाही. दुसरीकडे अनेक चालक बेदरकारपणे गाड्या चालवितात, ओव्हरटेक करतात, अशा सर्व प्रसंगात प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.रोहा आगार प्रशासनाने गाड्या दुरुस्तीबरोबरच चालकांवरील कामांचा अतिरिक्त ताण कमी केला पाहिजे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असा एसटीचा सुरू असलेला कारभार थांबला पाहिजे.- अ‍ॅड. हर्षद साळवी, शिवसेना कामगार संघटक, रोहा

टॅग्स :Raigadरायगड