शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सहा आसनी रिक्षाला अपघात

By admin | Updated: November 19, 2015 00:24 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जेटीवरून प्रवासी घेऊन बोर्लीकडे निघालेली सहा आसनी रिक्षा दिघी खाडीमध्ये पडली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जेटीवरून प्रवासी घेऊन बोर्लीकडे निघालेली सहा आसनी रिक्षा दिघी खाडीमध्ये पडली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यातील एका महिलेस महाड येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास समुद्रातील ओहोटीमुळे खाडीला पाणी कमी झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिघी येथे मुरु ड लाँचने आलेले प्रवासी बोर्लीपंचतन किंवा अन्य मार्गावर झटपट प्रवासासाठी मिनीडोरमधून प्रवासी वाहतूक सुरू असते. मंगळवारी सायंकाळी प्रवाशांना घेऊन टाटा मॅजिक दिघी जेटीवरून बोर्लीपंचतनकडे येण्यास निघाली. जेटीवरून बोर्ली-श्रीवर्धन मुख्य रस्त्यापर्यंत दिघी खाडीलगत भराव टाकून एक कच्चा रस्ता दोन तीन वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे. जेटीचे काम सुरू असल्याने मोठे दगड बाहेर आले असून तोे अपूर्णावस्थेत आहे. या रस्त्यानेच वाहनांची वर्दळ असते, ही गाडी जेटीवरून काही मीटर अंतरावर आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व रस्त्याच्या कडेला कठडे नसल्याने ही टाटा मॅजिक १५ ते २० फूट खोल खाडीमध्ये पलटी झाली. त्यामुळे गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामध्ये चालक युनुस बोदलाजी, प्रमोद पाटील (३६, रा. नाशिक), आलिया दळवी (रा. दिघी), सईद दळवी.(रा. दिघी) हे जखमी झाले तर सीमा पाटील यांना उपचारासाठी महाड येथे हलविण्यात आले आहे. (वार्ताहर)