शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर ट्रकला अपघात, चालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 00:49 IST

मागील वर्षात मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झालेल्या वावंढळ पुलावर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रकला अपघात झाला.

मोहोपाडा : मागील वर्षात मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झालेल्या वावंढळ पुलावर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रकला अपघात झाला. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी ट्रकमधील कापूस ट्रकसहित खाक झाल्याची घटना घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी असून, मृत्यूशी झुंज देत आहे.टोलवसुली करणाºया मार्गावर संबंधित यंत्रणेचा निष्काळजीपणा जीवावर बेतत आहे. मुंबई-पुणे जुन्या मार्गावर खोपोलीहून पनवेलच्या दिशेने जाताना वावंढळ गावानजीक ओढ्यावर पूल आहे. पुलाच्या अगोदर वळणदार रस्ता आणि अरुंद पूल यामुळे वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नसून, पुलाचा कठडा तोडून अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील वर्षात पुलावर ५० पेक्षा जास्त अपघात घडले आहेत. जुलै २०१९ मध्ये लागोपाठ पाच अपघात पुलावर घडून दोन बळी गेले तर आठ गंभीर जखमी झाल्यानंतर आयआरबीकडून पुलाच्या सुरुवातीला पिंप आणि सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती; परंतु तात्पुरती मलमपट्टी आता निघाली असून, सिग्नल बंद तर पिंपही जागेवर नाहीत. यामुळे अपघातांनी डोकेवर काढले असून कापूस घेऊन जाणारा ट्रक पुलाचे कठडे तोडून ओढ्यात कोसळला. यामध्ये ट्रक चालक (नाव समजले नाही) गंभीर जखमी झाला असून, त्यातील कापूस खाक झाला आहे. या वेळी खोपोली अग्निशमन दलाच्या जवानांनी बुधवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास लागलेली आग शर्थीचे प्रयत्न करून तासाभरात आटोक्यात आणली.