शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांबाबत ४० गावांचा एल्गार

By admin | Updated: December 14, 2015 01:26 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

दासगाव : महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. याकरिता नडगाव गावात झालेल्या एका सभेत खाडीपट्टा बहुविकास संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या विभागातील प्रदूषण, रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वामणे रेल्वे स्थानक आदी समस्यांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात जवळपास ४० गावांचा समावेश आहे. दादली, वराठी, सव, गोमेंडी, जुई, तुडील, चिंभावे, नरवण, खुटील, रावढळ, आंबीवली आदी गावांचा समावेश आहे. या विभागात असलेल्या समस्यांबाबत या परिसरातील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे विविध राजकीय संघटनांच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. मात्र आता राजकारण विरहित लढा देण्याकरिता या विभागातील ४० गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. या परिसरात महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी ओवळे येथे सोडले जात असल्याने खाडी प्रदूषित होते. या विभागातून रेल्वे जावून देखील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. गावातील जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या आदी समस्यांबाबत रविवारी नडगाव गावात ४० गावातील ग्रामस्थ एक झाले. नडगाव गावात झालेल्या बैठकीला ४० गावातील जवळपास ३०० ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत खाडीपट्टा बहुविकास संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी इनामतखान देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी नामदेव घाणेकर, सचिवपदी वसंत भडवळकर यांची निवड करण्यात आली. येथील ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावू असे इनायत खान देशमुख यांनी सांगितले.