शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कर्जतमध्ये फिल्मी स्टाइलने अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:13 IST

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार तासांत आरोपी गजाआड

कर्जत : तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे गुरुवारी रात्री अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. उल्हास नदीमध्ये एक किलोमीटर धावत जात अपहरण करण्यात आल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात येताच पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या चार तासात अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.गणेश अनंता घारे (३५) हा आपल्या मित्रांसह २० फेब्रुवारी रोजी रात्री सांगवी येथील उल्हासनदीमध्ये गप्पा मारत बसले होते. अतुल घारे आणि रमेश घारे यांच्यासोबत गणेश गप्पा मारत असताना रात्री अकराच्या दरम्यान नदीलगतच्या रस्त्यावर चार-पाच पांढऱ्या रंगाच्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या. त्यातील लोक आपल्याकडे ओरडत येत असल्याने नदीमध्ये बसलेले तिघेही पळू लागले. या वेळी अज्ञातांनी एक किलोमीटर अंतर धावत जाऊन गणेश यांना पकडले आणि गाडीमध्ये टाकून कर्जतच्या दिशेने निघून गेले.गणेश यांच्याबरोबर असलेल्या तरुणाने घडलेली घटना त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर अपहृत गणेश बंधू योगेश यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्याकडे तक्रार केली. याचदरम्यान एक फोन आला आणि तुमचा माणूस माझ्याकडे नेरळला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि पहाटे कर्जतचे पोलीस नेरळ येथे पोहोचले. पोलीस निरीक्षक भोर, पोलीस उपनिरीक्षक गावडे यांच्या मदतीला नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अविनाश पाटील हे सर्व नेरळ गावातील आनंदवाडी येथे पोहोचले.तेथे अपहरण करून आणलेल्या गणेश अनंता घारे यांना ठेवण्यात आले होते आणि त्या खोलीच्या बाहेर राजू बबन मरे हे झोपले होते. पोलिसांनी प्रथम गणेश घारे यांची सुटका करून त्यांच्याकडून माहिती घेऊन अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कार तसेच गणेश घारे यांचे अपहरण करणाºया अन्य पाच जणांना ताब्यात घेतले.फिल्मी स्टाइलने करण्यात आलेल्या अपहरण प्रकरणी नोंद करण्यात आली. याप्रकरणी राजू बबन मोरे (३९), भूषण विक्रमसिंग राजपूत (२४), नीलेश बुधाजी मोरे(२७), शाहीद आलिम शेख (२३), लखन अशोक गायकवाड (२४), बाळाजी बबन पोल्ले (२९) यांना अटक केली आहे. सर्वांना कर्जत न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.