शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरती वानखेडे समर्थकांचा मोर्चा

By admin | Updated: November 17, 2015 00:31 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयावर निलंबित

महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयावर निलंबित प्राचार्या आरती वानखेडे यांच्या समर्थकांनी मोर्चा काढला. विशेष म्हणजे या मोर्चात शिवसेनेचे नेते देखील सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मागील आठवड्यात न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. धनाजी गुरव पदभार स्वीकारण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. पदभार स्वीकारल्यानंतर माजी प्राचार्या आरती वानखेडे यांच्याशी प्राचार्य गुरव यांची वादावादी झाली होती. शहर पोलीस ठाण्यात वानखेडे यांनी आपल्याला मारहाण करून विनयभंग केल्याची फिर्याद दाखल केली होती तर कल्पना महाडिक यांनीही वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र आठ दिवसानंतरही धनाजी गुरव यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ सोमवारी प्रांत कार्यालयावर शिवाजी चौकातून मोर्चा काढला. या मोर्चात शिवसेना उपजिल्हा प्रमुख विपीन म्हामुणकर, तालुका शिवसेना प्रमुख सुरेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्य बाळ रावुळ, मधुकर गायकवाड, वंदना मोरे, राजू मांडे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रांत कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. मंडळाने प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी डीवायएसपी अंजली सोनावणे, पोलीस निरीक्षक नितीन जगताप, पोलीस निरीक्षक अशोक पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)