शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोरखार खाडीपुल ते गोवा महामार्गाला जोडणारा पूल लवकरच उभारणार, महेश बालदी यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2023 17:32 IST

विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी ( दि२०) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि  ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.

- मधुकर ठाकूर

उरण : अनेक वर्षांपासून  रखडलेल्या बोरखार खाडी पुल ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या दोन पदरी रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुमारे ४ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार आहे .त्यामुळे या खाडीपुलाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.यामुळे बोरखार परिसराचा कायापालट होईल असा विश्वास आमदार महेश बालदी यांनी मनोगतातून व्यक्त केला.   उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील विंधणे ते बोरखार रस्ता डांबरीकरण करणे -४ कोटी ५० लाख , विंधणे ते खालचा पाडा रस्ता कॉक्रीटीकरण करणे -४० लाख , बोरखार येथील रंगमंच सुशोभित करणे- २० लाख , बोरखार येथील सभामंडप बांधणे -१५ लाख , बोरखार येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे -२० लाख ,टाकीगाव येथील रस्ता कॉक्रीटीकरण करणे - २० लाख , टाकीगाव येथे स्मशानभूमी बांधणे -१० लाख ,धाकटी जुई येथे सभामंडप बांधणे- १० लाख ,धाकटी जुई येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख ,खा.पाडा विंधणे येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २० लाख रुपये, विंधणे ( बौध वस्ती )येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व स्ट्रीट लाईट बसवणे - ३० लाख आदी विविध विकासकामांसाठी ६ कोटी ६० लाख रुपयाचा निधी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे . 

या मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी ( दि२०) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि  ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. उरण तालुक्यातील बोरखार हे जेएनपीए बंदराच्या हाकेच्या अंतरावर असलेले विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनारी वसलेले एक दुर्गम गाव आहे.अशा गाव परिसराचा संपर्क हा तालुक्यातील विकसित भागाशी जोडता यावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या बोरखार खाडी पुल ते गोवा महामार्गाला जोडणाऱ्या दोन पदरी रस्त्यासाठी सुमारे ४ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार असून तेही काम लवकरच मार्गी लागणार आहे.त्यामुळे बोरखार परिसराचा कायापालट होईल असा विश्वास  आमदार महेश बालदी यांनी मनोगत व्यक्त करताना केला आहे. विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथमच ६ कोटी ६० लाख रुपये व बोरखार खाडी पुलावर पुल उभारण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतल्याने बोरखार परिसरातील  समाजसेवक तेजस डाकी यांनी आमदार महेश बालदी यांचा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Raigadरायगड